शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप
3
'हिंदू व्हॉट्सॲप ग्रुप' बनवून आयएएस अधिकारी अडचणीत; सरकारने केली कडक कारवाई
4
"महायुतीत राहून विरोधात काम करु नका"; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा
5
"मला समजत नाही की असं का होतं?, महिन्यातून एकदा..."; अभिनेत्रीला होताहेत प्रचंड वेदना
6
ऐन निवडणुकीत काँग्रेस-भाजपाला धक्का! १० नेत्यांच्या हाती तुतारी; शरद पवार गटात केला प्रवेश
7
सहा मतदारसंघांमध्ये महायुती, मविआच्या उमेदवारांची गणिते बिघडणार?
8
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ‘आप’चे उद्धव ठाकरेंना समर्थन? हरयाणाचे दिले उदाहरण; म्हणाले...
9
Mohammed Shami कमबॅकसाठी तयार! कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध उतरणार मैदानात?
10
आमचे उपकार माना, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असला असता; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
11
योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजित पवारांचा विरोध, पण...; स्पष्टच बोलले
12
IND vs AUS: पहिल्या कसोटीआधीच टीम इंडियाचं 'टेन्शन' वाढलं! खेळपट्टीबाबत आली महत्त्वाची अपडेट
13
कर्नाटकमध्ये सरकारी ठेक्यांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण? सिद्धारामैय्या सरकार वादात, भाजपाकडून तीव्र विरोध   
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आघाडी म्हणजे भष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, त्यांची पीएचडी विकास थांबवण्यात', पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा
15
"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान
16
नागपूर दक्षिणमध्ये राजकीय 'महाभारत', मते-पांडव यांच्यातच काट्याची लढाई!
17
Baba Siddique : रात्री ४ मित्रांचा इंटरनेट कॉल...; शूटर शिवापर्यंत कसे पोहोचले पोलीस, कसं सापडलं नेमकं लोकेशन?
18
'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, मविआ कार्यालयात जाऊन जाब विचारला; नेमका प्रकार काय?
20
IND vs AUS : पर्थ स्टेडियम 'लॉकडाउन'; इथं टीम इंडियानं लावलाय सीक्रेट ट्रेनिंग कॅम्प

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या मतदानापूर्वी भाजपासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 4:07 PM

राज्यसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या आमदारांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उद्या म्हणजे १० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात सामना होईल. या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. 

त्यातच अलीकडेच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाल्याने निवडणुकीच्या मैदानात भाजपा मागे पडल्याचं चित्र दिसून येते. फडणवीस यांनी ऑनलाईन बैठका, फोन यांच्या सहाय्याने अपक्ष आणि घटक पक्षाच्या आमदारांशी संवाद साधत होते. परंतु निवडणुकीत फडणवीसांना मतदान करता येईल का? हा प्रश्न मोठा होता. तत्पूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीला काही तास शिल्लक असताना भाजपासाठी पॉझिटिव्ह बातमी आली आहे. 

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. आता राज्यसभेच्या मतदानापूर्वी फडणवीस भेटीगाठी, बैठका घेण्यात व्यस्त झाले आहेत. त्याचसोबत निवडणुकीत त्यांना मतदानही करता येणार आहे. आज भाजपा आमदारांची हॉटेल ताज येथे बैठक होणार आहे. या बैठकीला फडणवीस हजर राहतील असंही सांगितले जात आहे. या बैठकीत मतदान कसे करायचे याची माहिती सर्व आमदारांना दिली जाणार आहे. 

मविआची धाकधूक वाढली राज्यसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या आमदारांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी अपक्ष आणि घटक पक्षांच्या आमदारांची मदत लागणार आहे. परंतु घटक पक्षाने मविआ सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यात बहुजन विकास आघाडीकडे ३ मते आहेत. त्यांनी आम्ही १० तारखेलाच निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली आहे. तर बच्चू कडू यांनीही मविआ आमदारांच्या बैठकीला दांडी मारली होती. त्याचसोबत आता राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी द्यावी असा अर्ज कोर्टात केला होता. परंतु त्यांनाही मतदानाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे पुढील २४ तास मविआची धाकधूक वाढली आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा