शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

Rajya Sabha Election: शिवसेना आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर; तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 8:01 PM

शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांना गेल्या ३ दिवसांपासून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला ठेवण्यात आले आहे

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांवर होणाऱ्या निवडणुकीतील मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपापल्या आमदारांना एकाच छताखाली आणत आहे. मतदानात कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी पक्ष खबरदारी घेत आहे. शिवसेनेने या निवडणुकीत २ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांना गेल्या ३ दिवसांपासून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला ठेवण्यात आले आहे. कधी ट्रायडंट तर कधी रिट्रिट हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार राहत आहेत. २ दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदारांसह महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक ट्रायडंटला पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे १ आमदार गैरहजर होते. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही या आमदाराने उपस्थिती लावली नाही. त्यामुळे हे आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गैरहजर राहणाऱ्या शिवसेना आमदाराचं नाव तानाजी सावंत असं आहे. 

तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा पहिल्यांदाच होते असं नाही. यापूर्वीही तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीत शिवसेनेचा अपमान होतोय त्यामुळे पक्षप्रमुखांनी विचार करावा असं विधान केले होते. मंत्रिपद मिळत नसल्यानेही तानाजी सावंत(Tanaji Sawant) नाराज असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर महाविकास आघाडीत असूनही सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. आपल्या सडेतोड वक्तव्यांनी सातत्याने अडचणीत येणारे तानाजी सावंत हल्ली माध्यमांसमोर येत नाहीत. त्यात राज्यसभा निवडणूक इतकी महत्त्वाची असताना पक्षाच्या बैठकीला दांडी लावल्याने तानाजी सावंत यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न निर्माण होतो.

अलीकडे शिवसंपर्क अभियानानिमित्त तानाजी सावंत यांनी उस्मानाबादेत म्हटलं होतं की, सहा महिनेच मंत्री होतो या कडेपासून त्या कडेपर्यंतच्या जिल्ह्याने आपली कार्यपद्धती पाहिली आहे. पक्षाचा आदेश आला आणि आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार केले. राज्यात जवळपास ७० टक्के जागांवर शिवसेनेने राष्ट्रवादीविरोधात लढा दिला. हे आपल्या लक्षात असले पाहिजे असं त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीचे लोक इथे अधिकाऱ्यांपुढे ताठपणे बसून आदेश देत असतात. शिवसैनिकांची तशी परिस्थिती राहिली नाही. याची खंत मनात आहे. नशिबात असेल तर मंत्री होईन, नाही तर नाही. पण माझ्या शिवसैनिकांची मान खाली जाऊ देणार नाही. शिवाय माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही असंही तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले होते.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा