शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

राज्यसभेचा आज फैसला, ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, कोणाचा पत्ता कटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 6:40 AM

Rajya Sabha Election 2022 : मतदानाला विधानभवनात सकाळी ९ ला सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. 

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक शुक्रवारी होत असून महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. सात उमेदवार रिंगणात असल्याने पत्ता कोणाचा कटणार, या बाबत प्रचंड उत्सुकता आहे. मतदानाला विधानभवनात सकाळी ९ ला सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. 

आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद ठरू नये म्हणून प्रत्येक पक्ष डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत आहे. कशा पद्धतीने मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीची मते देताना काय काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगत मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे. 

देशमुख, मलिक यांच्या मतदानाचा आज फैसला२८८ सदस्यांच्या विधानसभेत शिवसेनेचे रमेश लटके यांच्या निधनामुळे २८७ सदस्य आहेत. कोठडीत असलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मतदान करण्याची परवानगी मिळावी,  यासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने तो फेटाळला. दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा फैसला शुक्रवारी सकाळी होणार आहे. या दोघांना मताधिकार न मिळल्यास? पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ४१ इतका असेल. मताधिकार मिळाला तर ४२ चा कोटा असेल.

काँग्रेसच्या आमदारांची बडदास्तराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी सायंकाळी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आमदारांचा मुक्काम असलेले हॉटेल गाठून तेथे आमदारांशी चर्चा केली. खरगे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीसोबतच राज्यसभा निवडणुकीबाबतही शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. 

देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनभाजप व समर्थित अपक्ष आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ते ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी हॉटेलवर पोहोचून आमदारांना मार्गदर्शन केले. 

रिंगणातील उमेदवारभाजप : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक शिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल काँग्रेस :  इम्रान प्रतापगडी 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र