शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

"नशीब! संजय राऊत काठावर वाचले नाहीतर उलटं झालं असतं; संजय पवार निवडून आले असते" 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 4:46 PM

पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे हा आमचा प्रयत्न होता असं छगन भुजबळांनी सांगितले.

नाशिक - राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले, या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु निवडणूक नियमांचे भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे १ मत बाद झाले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत भाजपाचे ३, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काही अपक्षांची मते मिळवण्यात भाजपाला यश आले. 

या निकालावर छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. दुर्दैवाने आमच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. मविआला अडचण असं काही नाही. मविआनं बहुमत सिद्ध केलं तेव्हा आम्हाला १७० आमदारांचा पाठिंबा होता. शेवटचा उमेदवार ३९ मतांवर राहिला. एकूण जर बेरीज केली तर आमची संख्या १६६ च्या वर आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ही निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे हा आमचा प्रयत्न होता. संजय राऊत यांचीच अडचण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सरकार असताना आम्ही १७० ऐवजी १८० ची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो आहोत.  पवारांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर यावेळी उफाळून आली. मविआचा कोणताही आमदार आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे. तिथल्या आमदाराला तो दुखावला जाणार नाही, त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे. एकोप्याने पुढे जावं लागेल असंही छगन भुजबळ म्हणाले. 

संजय राऊत काठावर वाचलेमविआच्या आमदारांना, जिल्ह्यातील पालकमंत्री यांना विश्वासात घेऊन काम करावं. जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे. आम्ही एकमेकांच्या टांगेत टांग टाकता कामा नये. नाहीतर ऐन निवडणुकीत हे प्रश्न उफाळून येतात. तो पर्यंत कोणी बोलत नाही. मुख्यमंत्री भेटत नाही असं मी म्हणणार नाही. त्यांचे ऑपरेशन झालं आहेत. संजय राऊत यांनी मते न देणाऱ्यांची नावे घेतली ठीक आहे. आता त्यांना आपण पुढच्या कामासाठी जवळ कस करता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. संजय राऊत(Sanjay Raut) काठावर वाचले. आणखी उलट झालं असत. आमचं नशीब नाहीतर उलट झालं असत, संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते. आम्ही तर आमच्या लोकांना सगळं समजावून सांगितलं होतं. मात्र त्यातून या चुका कशा झाल्या, काय माहिती असंही भुजबळ यांनी सांगितले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळRajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊत