Rajya sabha Election 2022: '...म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं'; संजय राऊतांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 11:39 AM2022-06-07T11:39:59+5:302022-06-07T12:08:32+5:30

Rajyasabha Election 2022: शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

Rajyasabha Election 2022: Why Shivsena MLA put in hotel before Rajyasabha Election 2022, Sanjay Raut says reason | Rajya sabha Election 2022: '...म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं'; संजय राऊतांनी सांगितलं कारण

Rajya sabha Election 2022: '...म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं'; संजय राऊतांनी सांगितलं कारण

Next

मुंबई: सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. पण, सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यात काही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्वाची माहिती दिली. 

'राज्यसभेचे मतदान किचकट'
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. या निवडणुकीत आमदार फुटू नयेत, याची प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. दरम्यान, शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवले, याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली. 'राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया ही तांत्रिक आणि किचकट असते. हे मतदान नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने असते. त्याबाबत आमदारांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे,' असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. 

'आमचे सर्व उमेदवार निवडून येणार'
यावेळी संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'फक्त आम्हीच नाही तर भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनाही हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. मग फक्त शिवसेनेच्याबाबतीच प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जात आहे? तुमचं ते गेटटुगेदर आणि आमच्याबाबतीत लगेच प्रश्न उपस्थित केले जातात. मी खात्रीने सांगतो की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. 10 जून रोजी रात्री आठ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट झालेला असेल', असेही राऊत यांनी म्हटले.

शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवणार
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांना सोमवारी रात्री मार्वे बीचवरील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आमदारांना मंगळवारी दुपारी विधानभवनापासून काही अंतरावर असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. शिवसेनेच्या जवळपास २५ आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेकडून हे पाऊल उचलण्याची आल्याची चर्चा आहे.

असे आहे मतांचे गणित
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून 26 अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित 16 मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची 22 अतिरिक्त मतं असून, अन्य 7 आमदारांचा पाठिंबा धरता एकूण 29 मते आहेत. उर्वरित 13 मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे. 
 

Web Title: Rajyasabha Election 2022: Why Shivsena MLA put in hotel before Rajyasabha Election 2022, Sanjay Raut says reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.