नाशिक : राज्यातील गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करणा:या केबीसीच्या प्रमुख संचालकांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करावी, या मागणीसाठी छावा व संभाजी ब्रिगेडच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूकदार व एजंटांनी बुधवारी भर पावसात गोल्फ क्लब मैदानावरून मोर्चा काढला़ मात्र मोर्चाला परवानगी नसल्याने 137 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल़े
‘छावा’चे करण गायकर व संभाजी ब्रिगेडचे गणोश कदम यांच्या मार्गदर्शनखाली ‘केबीसी ठेवीदार बचाव कृती समिती’ची स्थापना करण्यात आली़ समितीतर्फे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चेक:यांना गोल्फ क्लब मैदानाच्या गेटवरच अडविल़े (प्रतिनिधी)
गुंतवणूकदाराला
1 कोटीचा धनादेश
च्हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील काशिनाथ तुकाराम खिल्लारे यांनी 2010-11 मध्ये 14 लाख 37 हजार 800 रुपयांची गुंतवणूक केली. त्यापोटी 2016 मध्ये तब्बल 1 कोटी रुपये मिळतील, असे सांगण्यात आले. तसा धनादेशही खिल्लारे यांना देण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खिल्लारे यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
केबीसीविरोधात जिल्ह्यात आतार्पयत 75 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात सुमारे 2क् कोटी रुपयांची फसवणूक झाली. जिल्ह्यात 4 ते 5 हजार लोकांनी केबीसीत गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
नाशिकचे पथक
आज औरंगाबादेत
च्केबीसी कंपनीविरुद्ध तक्रारी नोंदवून घेण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक विशेष पथक गुरुवारी औरंगाबादेत येणार आहे.
च्शेकडो एजंटांनी केबीसीत गुंतवणूक करण्यास सभासदांना उद्युक्त केले होते. केबीसी कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडणा:या व पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढे न आलेल्या एजंटांचा शोध सुरू आहे.
कनोली गावाला ‘केबीसी’चा विळखा
संगमनेर : ‘केबीसी’ कंपनीची पाळेमुळे अहमदनगर जिल्ह्यातही रुजली असून कनोली (ता. संगमनेर) या संपूर्ण गावाची सुमारे 3क् कोटींची लुबाडणूक झाल्याचे समोर आले.
प्रवरा नदीकाठावरील सुमारे 4 हजार 5क्क् लोकसंख्येचे कनोली गावही ‘केबीसी’च्या फसवेगिरीत अडकले. ऊस, टोमॅटो, वांगी आदी नगदी पिके घेऊन शेतक:यांनी चार पैसे गाठीला बांधले. 4 वर्षापूर्वी या गावात केबीसीने शिरकाव केला. पैशांच्या मोहापायी अनेकांनी यात गुंतवणूक केली. ‘केबीसी’ कंपनी बुडाली तर आमची जमीन विकून पैसे देऊ. 2क्14 मध्ये कनोली गावात पैशांचा पाऊस पडणार आहे. पोत्यात भरून पैसे आणू. या एजंटांच्या भूलथापांना बळी पडून 97 टक्के गाव जाळ्यात अडकले. सुरूवातीला पैसे मिळाले.
विश्वासार्हता वाढल्याने कुणी मुलीच्या लगAासाठी ठेवलेले, तर कुणी म्हातारपणाची पुंजी म्हणून ठेवलेले, कुणी जमीन विकून, कुणी सगे-सोय:यांकडून आणून, कुणी दागिने मोडून-तोडून, गहाण ठेवून पैसे ‘केबीसी’त भरले. परंतु आता ‘केबीसी’चे पितळ उघडे पडल्याचे समजताच कनोलीवर आभाळच कोसळले आहे. (प्रतिनिधी)
अमरावती पोलिसांकडून मागवली माहिती
अमरावती : नाशिककरांना केबीसी कंपनीने कोटय़वधी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ आरोपींना अटक केली. या कंपनीविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत का ? याची माहिती नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखा पथकाने अमरावती पोलिसांना बुधवारी एका पत्रद्वारे मागितली. अमरावती आर्थिक गुन्हे शाखेकडून शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याला पत्र पाठवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणोश अणो सांगितले.