शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

संमेलनाध्यक्ष उगारणार उपोषणाचे शस्त्र

By admin | Published: January 23, 2016 2:38 AM

साहित्य महामंडळाने अध्यक्षीय भाषण न छापून राज्यघटनेचा अवमान केला आहे. भाषणाचे मुद्दे चौकटीत बसत नाहीत म्हणूनच महामंडळाने ते भाषण जाणीवपूर्वक छापले

पुणे : साहित्य महामंडळाने अध्यक्षीय भाषण न छापून राज्यघटनेचा अवमान केला आहे. भाषणाचे मुद्दे चौकटीत बसत नाहीत म्हणूनच महामंडळाने ते भाषण जाणीवपूर्वक छापले नसल्याचा पुनरूच्चार करीत आता संमेलनाध्यक्षांनी आंदोलनाचे शस्त्र उगारण्याचे ठरविले आहे. येत्या २६ जानेवारीपर्यंत महामंडळाने भाषण छापले नाही तर २७ जानेवारीला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बाहेर सपत्निक लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी दिला. संमेलनाच्या इतिहासात यंदा प्रथमच संमेलनाध्यक्षांचे भाषण महामंडळाकडून छापले गेले नाही. त्यामुळे ते वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. डॉ. सबनीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन स्वखर्चाने भाषण छापून घेतले. पोलिसांनाही पत्र दिले असल्याचे सांगून महामंडळाने अजूनही माझ्याशी संवाद साधलेला नाही, मला काय ते गुन्हेगार समजतात का, असा प्रश्नही सबनीस यांनी उपस्थित केला.२६ जानेवारीपर्यंत महामंडळाच्या निर्णयाची वाट पाहणार आहे. काही निर्णय न झाल्यास उपोषण निश्चित आहेच, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)महामंडळाच्या बैठकीतच घेणार निर्णय : वैद्यपुणे : अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही. महामंडळाने न छापलेल्या प्रतींचे बिल आम्ही कसे अदा करणार, असा सवाल डॉ. माधवी वैद्य यांनी केला. अध्यक्षीय भाषण छापणे ही महामंडळाची जबाबदारी असताना संमेलनापूर्वी याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मी वैयक्तिक खर्च करून दि.१६ जानेवारी रोजी अध्यक्षीय भाषणाच्या २,००० प्रती छापल्या. हे सर्व बिल महामंडळाने २६ जानेवारीपूर्वी अदा करावे, अशी मागणी श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. याबाबत वैद्य म्हणाल्या, ‘संमेलनाध्यक्षांनी दि.१५ रोजी १२९ पानांचे अध्यक्षीय भाषण सुपूर्त केले. ते भाषण वाचायला आणि छपाईला द्यायला वेळच नव्हता. अध्यक्षीय भाषण हे त्या व्यक्तीने विचारपूर्वक लिहिलेले असते. त्यामुळे ते छापताना महामंडळ या विचारांशी सहमत असेलच नाही, असे स्पष्ट करण्यात येते. त्यामुळे सेन्सॉरशिपचा प्रश्नच येत नाही. त्या म्हणाल्या, ‘‘कोणताही निर्णय हा महामंडळाच्या बैठकीतच होत असतो. कार्यकारिणी, सर्व घटक व संलग्न संस्था, पदाधिकारी यांच्या मंजुरीशिवाय अध्यक्षीय भाषणाबाबत निर्णय घेता येणार नाही. श्रीपाल सबनीस यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.’’