शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

राम जन्मला गं सखे.. राम जन्मला!

By admin | Published: April 05, 2017 1:21 AM

श्रीरामाचा जन्मोत्सव (श्रीरामनवमी) पारंपरिक पद्धतीने दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात श्रीरामाच्या जयघोषात साजरा करण्यात आला.

भोर : सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेल्या भोरचे संस्थानिकांच्या राजप्रासादाच्या दरबार सभागृहात पंतसचिवांचे कुलदैवत असलेल्या श्रीरामाचा जन्मोत्सव (श्रीरामनवमी) पारंपरिक पद्धतीने दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात श्रीरामाच्या जयघोषात साजरा करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.या रामजन्मोत्सवाला भोरचे राजे चिमणाजी ऊर्फ आबाराजे पंतसचिव, त्यांच्या पत्नी ऊर्मिलादेवी, पुत्र राजेश, योगेश व नातू पार्थ, स्वातीदेवी, गायत्रीदेवी, ईशादेवी, निमिसादेवी, उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, के. टी. शेटे, नगराध्यक्षा तृप्ती किरवे, नगरसेवक तानाजी तारू, उमेश देशमुख, जगदीश किरवे, प्रसन्नकुमार देशमुख, प्रमोद कुलकर्णी, प्रमोद फडणीस, मधुकर पैठणकर, राजाभाऊ दुसंगे जकीर, गणीभाई भालदार, संतोष ढवळे, संजय देवकर, श्रीपाद गांडेकर, मुकुंद गांडेकर, महाशब्दे व शहरासह ग्रामीण भागातील भविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मंगळवारी सकाळी ११ वाजता राजप्रासादातून राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती, नागरिक ढोलताशा पथकाच्या गायन वाद्याच्या साथीने सजवलेल्या पालखीतून छत्र, चामरे, अब्दागिरी घेतलेले मानकरी यांच्यासह राजसुवर्णकार यांच्याकडे राममूर्ती आणण्यासाठी गेले. मूर्ती उत्साही मिरवणुकीने पालखीतून राजप्रसादात आणताना नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. नंतर ही मूर्ती सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली. मधुकर पैठणकर व राजाभाऊ दुसंगे यांनी रामाचे भजन गायले, प्रीती शानबाग हिने पाळणा गायला आणि दुपारी ठीक १२ वाजता आबाराजेंचे पुत्र राजेश, योगेश यांनी पाळण्याची दोरी ओढून रामाच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करीत श्रीरामाचा जयजयकार करीत घोषणा दिल्या. या वेळी हजारो भाविक, भक्तांना सुंठवडा व महाप्रसाद वाटप करण्यात आला.पहाटेपासूनच भोर शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. रांगोळी काढली होती. राजवाडा परिसरात विविध प्रकारची प्लास्टिकची खेळणी, मातीची भांडी, खाद्यपदार्थांचे, थंड पेयाचे कलिंगडाचे व विविध फळांच्या उसाच्या रसाचे स्टॉल लावण्यात आले होते. लहान मुलांना व वृद्धांना खेळण्यासाठी रेल्वेगाडी, झोपाळा, मिकी माऊस, जंपिंग जॅक याची सोय होती. त्यामुळे दिवसभर चिमुकल्यांसह आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती.भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची सुविधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बजरंग आळी येथे, तर होमगार्ड पथकाने मंगळवार पेठेत तसेच गुरुकृपा ट्रस्टच्या वतीने राजवाड्यात करण्यात आली होती. सकाळपासून शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी दर्शनासाठी राजवाड्यात रांगा लावल्या होत्या. भोर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.भोरचे ग्रामदैवत जानाईदेवी यात्रा व श्रीरामनवमीनिमित्त राजबागेत कुस्त्याचा जंगी आखाडा व सुमारे एक लाख ३१ हजार रुपयेजानाई केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नामांकित महाराष्ट्र केसरी पैलवानांनी हजेरी लावली. भोरपासून १७ किलोमीटरवर असलेल्या सरदार कान्होजी जेधेच्या वाड्यात जेधेंचे वंशज रणधीर जेधे, युवराज जेधे व कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने श्रीरामनवमी साजरी करण्यात केली. >१७२० पासून साजरा होतोय उत्सवश्रीराम हे भोरचे संस्थानिक पंतसचिवांचे कुलदैवत असल्याने १७२० पासून हा जन्मोत्सव आणि सचिवपदाचे संस्थापक शंकराजी नारायण यांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव. असे दोन्ही उत्सव वैभवाने व भव्यतेने साजरे करण्याची परंपरा सुमारे ३०० पेक्षा अधिक वर्षांपासून सुरु आहे.