शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

माळशेजमध्ये दरडकोंडी

By admin | Published: July 05, 2016 1:56 AM

कल्याण-अहमदनगर मार्गावर माळशेज घाटात शंकर मंदिराजवळ रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास भल्या मोठ्या दरडी कोसळल्या. त्यामुळे या मार्गावर मढ ते टोकावडेदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद होती.

ठाणे : कल्याण-अहमदनगर मार्गावर माळशेज घाटात शंकर मंदिराजवळ रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास भल्या मोठ्या दरडी कोसळल्या. त्यामुळे या मार्गावर मढ ते टोकावडेदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद होती. पोकलेनच्या साहाय्याने दरडी फोडून त्या हटवण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी ७च्या सुमारास वाहतूक टप्प्याटप्प्यांत सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळपर्यंत मार्ग पूर्णपणे खुला होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तवली आहे.रोज किमान पाच ते सात हजार वाहनांची वर्दळ असलेल्या मुंबई-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१वरील माळशेज घाटात दरडी कोसळल्यामुळे रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक पुणे ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी अन्यत्र वळवली होती. घाटमाथ्यावरील अत्यंत धोकादायक वळणावरच शंकर मंदिराजवळ या दरडी कोसळल्या. त्या वेळी कोणतेही वाहन तिथून जात नव्हते. अन्यथा, मोठी हानी झाली असती, अशीही माहिती सूत्रांनी दिली.या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग ठाणे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रीती नाग यांच्या पथकाने सोमवारी सकाळी ७.३०पासून या ठिकाणी दरडी हटवण्याच्या कामाला सुरुवात केली. दरडी मोठ्या असून, मुसळधार पावसामुळे पुन्हा दरडी कोसळण्याची भीती होती. शिवाय रस्त्यावर दाट धुके होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत होते. यासाठी एक पोकलेन, एक जेसीबी आणि एका स्टोनब्रेकरचीही मदत घेण्यात आल्याची माहिती येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.कल्याण ते ओतूर आणि नगर ते कल्याण तसेच ओतूर ते कल्याण व ठाण्याकडे याच मार्गावरून भाजीपाला, दूध तसेच इतर प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. (प्रतिनिधी)वाहनांच्या रांगारविवारी रात्री दरडी कोसळल्यामुळे मार्ग सोमवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद केला होता. त्यामुळे आळेफाटामार्गे कल्याण, ठाण्याकडे येणाऱ्या अनेक एसटी बसेस आणि इतर वाहने ओतूरपासून मागे नाशिकमार्गे वळवली होती. तर, मुरबाड ते अहमदनगर जाणारी वाहतूक शहापूरमार्गे नाशिककडे वळवण्यात आली होती. तसेच नगरला जाणारी वाहतूक घोटीमार्गे, तर पुण्याकडे जाणारी वाहने कर्जतमार्गे वळवल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली.