शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी,रामदास आठवलेंचा सल्ला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 5:25 PM

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केंद्रातील मोदी सरकारला 'हम दो-हमारे दो' म्हणत जोरदार टोला लगावला होता. (Rahul Gandhi)

पुणे -काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत केंद्रातील मोदी सरकारला 'हम दो-हमारे दो' (Hum Do Hamare Do) म्हणत जोरदार टोला लगावला होता. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी राहुल यांना मोलाचा सल्ला दिला आहे. "राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि 'हम दो-हमारे दो'ची अंमलबजावणी करावी, असे आठवले यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आठवले हे नेहमीच आपल्या कवितांमुळे चर्चेत असतात. (Ramdas Athavale Advice Rahul Gandhi Should Get Married And Implement Hum Do Hamare Do)

"मोदी असो किंवा मनमोहन सिंग, राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा अपमान"; अर्थमंत्री संतापल्या 

शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले आठवले? -आठवले म्हणाले, दिल्लीतील शेतकरी आंदोलन वाढवत आहेत. सरकार चर्चेला तयार आहे. पण, कायदेच मागे घ्या, ही आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांची ही भूमिका असंवैधानिक आहे. तसेच 200 शेतकऱ्यांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे शेतकरीच जबाबदार आहेत. तिरंग्याचा अपमान दुर्दैवी आहे. याच बरोबर नवडणूक काळात काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात कृषी कायद्याचे आश्वासन दिले होते, याची आठवणही आठवले यांनी करून दिली. 

पूजा चव्हान आत्महत्येसंदर्भात बोलताना, पूजा यांच्या आत्महत्येस कुणी जबाबदार असेल तर त्याची चौकशी व्हावी, असंही आठवले म्हणाले. तसेच, मराठा आरक्षणाला आरपीआयचा संपूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’ वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पलटवार; भरसभागृहात म्हणाले...

राहुल गांधींनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' विधानावरून सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे. मग ते सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग.. माजी पंतप्रधान परदेशात गेले असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडून आणण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता, याची आठवण सीतारामन यांनी करून दिली. ‘हम दो, हमारे दो’ हेच मोदी यांचे सरकार; राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपा