कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले यांनी आरपीआयसाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती. मात्र, भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडत राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेसाठी आश्वस्त केल्याने आठवलेंनी माघार घेतल्याचे जाहीर केले. मात्र, आठवलेंनी कोल्हापुरच्या महायुतीच्या सभेत कवितेतून आपले शल्य व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आण...निवडून द्या कमळ आणि धनुष्य बाण...आम्ही वाढवणार आहोत भारताची शान, पण तुम्हाला द्यावे लागेल नरेंद्र मोदींकडे ध्यान.हे तुमचे आहे कोल्हापूर, बघा तुम्ही हा महायुतीचा महापूर, जसा भाजप आणि शिवसेनेचा जमलेला आहे सूर, म्हणून आज माझा भरून आलेला आहे उर.देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमलेली आहे जोडी, पण माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी
असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपले शल्य व्यक्त केले. रामदास आठवले यांनी युतीचे 40 ते 42 जागा निवडून आल्या पाहिजेत असे सांगितले. तसेच युतीच्या मंचावर बोलावल्याचे आभार मानले.