एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 03:47 PM2023-04-13T15:47:16+5:302023-04-13T15:51:15+5:30

कनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही असं आठवले म्हणाले.

Ramdas Athawale criticized Aditya Thackeray and Uddhav Thackeray on the statement that Eknath Shinde cried | एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले?

एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले?

googlenewsNext

मुंबई - अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे मातोश्रीत येऊन रडले असा दावा आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत केला. त्यावरून शिंदे समर्थकांनीही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यात युतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही त्यांच्या अनोख्या शैलीत ठाकरेंचा समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले अशी चारोळी आठवलेंनी म्हणत या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. 

रामदास आठवले म्हणाले की, आदित्य ठाकरे, म्हणतात, एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, म्हणूनच उद्धव ठाकरे तोंडावर पडले, रडण्याचा विषय नाही. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही. तो खरा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. रडणारे काम त्यांच्याकडून होईल असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे रडले असा आरोप करणे अत्यंत चुकीचा आहे. एकतर भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी आघाडी केली म्हणून शिंदेंनी बंड केले असं त्यांनी सांगितले. 

अजित पवारांना दिली ऑफर
राज्यात अजित पवारांबद्दल ज्याकाही चर्चा सुरू आहेत. त्यावरून रामदास आठवलेंना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले की, अजित पवार भाजपात जातील असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होणार नाही. कारण तेवढे आमदार नाहीत. पण राजकारणात काही होऊ शकते. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देऊ अशी ऑफरच रामदास आठवलेंनी दिली आहे. 

शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवार
आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जोरदार पलटवार केला आहे. म्हस्के म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे कष्टकरी, शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत. घरात मासा मेला म्हणून दारे बंद करून रडणारे नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा सगळ्या नेत्यांना बाजूला ठेऊन पंतप्रधान मोदींची वेगळी भेट उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तेव्हा ते रडत होते कारण नोटीस यांना आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींकडे ही मंडळी गयावया करत होती. आम्हाला कशाला नोटीस येईल? आपली, आपल्या नातेवाईकांची, मित्रांची परदेशात कुठे कुठे कंपन्या आहेत त्याचा सगळा चिठ्ठा आमच्याकडे आहे, त्या उघड कराव्या लागतील असा इशारा त्यांनी दिला. 

Web Title: Ramdas Athawale criticized Aditya Thackeray and Uddhav Thackeray on the statement that Eknath Shinde cried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.