शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:46 AM

बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले असं कदमांनी म्हटलं.

रत्नागिरी - बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे आणि त्याच्यानंतर लहान भाऊ तेजस ठाकरे. जी काही अक्कल आहे ती ठाकरेंनाच आहे. आम्ही सगळे बेअक्कल आहोत. बाळासाहेब आमच्यासाठी देव होते. त्यांनी शून्यातून आम्हाला उभे केले. आम्हाला बाळासाहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी उभी केली. हिंदुत्व जपलं. ते हिंदुत्व आणि बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर गहाण ठेवली. खरी गद्दारी त्यांनी केली असा हल्लाबोल बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

रामदास कदम म्हणाले की, नागपूरच्या अधिवेशनात जयंत पाटील स्पष्टच बोलले. ही राष्ट्रवादीची शिवसेना आहे. मनात जे होते ते ओठांवर आले. बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले. गद्दारी ही उद्धव ठाकरेंनी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. आम्ही भाजपात जाणार असं म्हटलं जातं. परंतु आजच सांगतो मरेपर्यंत आम्ही भगवा झेंडा सोडणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

धनुष्यबाण आम्हालाच मिळेलकाँग्रेसची बैलजोडी, गाय-वासरू याबाबत जे निकाल लागलेत. त्यात जे निकष लागले त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना न्याय मिळेल. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंनाच मिळेल. एकूण आमदार किती? एका आमदाराला, खासदाराला मिळालेली मते अशी मोजली जातात. शिंदेंसोबत ५० आमदार आणि १३ खासदार आहेत. ठाकरेंकडे १४ आमदार आहेत. नियमानुसार एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण मिळेल यावर शिक्कामोर्तब झालं पाहिजे असं मला वाटतं असं रामदास कदमांनी म्हटलं. 

अनिल परब बोगस वकीलसंजय राऊत सकाळपासून रात्रीपर्यंत ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी संघर्ष करतायेत. त्यांच्यावर अधिक बोलणार नाही. १४ तारखेला निकाल लागेल तेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात येईल. त्यांच्या आजुबाजूला ते अनिल परबसारखे वकील आहेत ते त्यांना कसं फसवतायेत हे लक्षात येईल. आमचा पक्ष बाळासाहेबांचा आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमची घटना झालेली आहे. नियमाप्रमाणे आमचं काम सुरू आहे. आम्ही गाफील नाही. कायदेशीर सर्व बाबी पूर्ण केल्या. आमच्याकडे अनिल परब यांच्यासारखे बोगस वकील नाहीत असं सांगत कदमांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. 

आमदार नाराज नाहीत, जनता खुश आहे प्रत्येक आमदाराला वाटतं मंत्री झालं पाहिजे. ते स्वाभाविक असते. आमच्याकडे कुणी नाराज नाही. फक्त मंत्रिपद मिळावे म्हणूनच आले असं नाही. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात विकासाचं ध्येय एकनाथ शिंदेंनी ठेवले आहे. कुठल्याही आमदाराला मी पडू देणार नाही. त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी जे काही खोके द्यायचे आहेत ते सगळे देईन असं आहे. मविआ काळात शिवसेना आमदारांना निधी मिळत नव्हता. म्हणून आमदार नाखुश होते. आता विकासकामाला सुरुवात झालीय. त्यामुळे जनता खुश आहे असं सांगत मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास कदमांनी भाष्य केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना