शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

'मातोश्री'वरील १०० खोक्याचा हिशोब द्यावा लागेल; आदित्य उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 10:57 AM

आवाज द्यायचं आमच्या जीवावर सुरू होते. अनेक केसेस आम्ही घेतल्यात. आम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुमचं योगदान काय? असा सवाल कदमांनी उपस्थित केला

रत्नागिरी - शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर बसले. उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले. ते बेडकासारख्या उड्या मारताय. आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, गेल्या अडीच वर्षात कुणाला भेटला? मातोश्री सोडलीच नाही. आदित्य ठाकरेशिवसेना मंत्र्यांची खाती सांभाळायचा. कुणाला काम करू द्यायचा नाही. प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडून पर्यावरण खात्यात १०० कोटी रुपये घेतलेत. त्याची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. त्या १०० खोक्याचे काय केले? १०० कोटीचं काय केले त्याचा हिशोब द्यावा लागेल. मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले? असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला आहे. 

रामदास कदम म्हणाले की, आदित्य ठाकरेंचे वय ३१ वर्ष आणि माझं राजकारणातील वय ५२ वर्ष आहे. त्यांचा राजकारणाचा अभ्यास किती हे महाराष्ट्राला कळलं आहे. आपलं वय काय, आपण काय बोलतोय, ठाकरे कुटुंबातील आहोत याचे भान ठेवायला हवे होते. गुवाहाटीला गेलेले आमदार मतदारसंघात कसे पाय ठेवतात ते पाहू असं म्हटलं. ते परतले. मतदारसंघात गेले. प्रत्येक मतदारसंघात प्रचंड स्वागत झाले. काय उखडलं तुम्ही? सगळे आमदार वरळी मतदारसंघातून गेले काय केले तुम्ही? आवाज द्यायचं आमच्या जीवावर सुरू होते. अनेक केसेस आम्ही घेतल्यात. आम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुमचं योगदान काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

नवीन मातोश्रीचा सोर्स काय?त्याचसोबत नवीन मातोश्रीचा सोर्स काय? स्वत: खोके घ्यायचे आणि दुसऱ्यांवर संशय निर्माण करायचा. बोलून काय होत नाही, सभा घेऊन काय होत नाही. मग संशय निर्माण करायचा. ही शेवटची धडपड आहे. आम्हाला कुणी शिकवू नये. पक्ष वाढवण्यात योगदान आमचं आहे. शिवसेना-भाजपा म्हणून तुम्ही लढला. त्यांचे १०६ आले आणि तुमचे ५५ आले. मातोश्रीवरची मिठाई बाहेर काढली असती तर तुमचेही जास्त निवडून आले असते. लोकांची तोंड गोड केले असते तर मतं मिळाली असती. पण मुख्यमंत्री व्हायचं म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. गद्दार उद्धव ठाकरे आहेत एकनाथ शिंदे नाहीत, ५० आमदार नाहीत असा घणाघातही रामदास कदमांनी केला.  

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरे