वरोरा (जि. चंद्रपूर) : योगगुरू रामदेवबाबा यांच्याविरुद्ध अखेर वरोरा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदेवबाबा यांनी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील जाहीर सभेत राहुल गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. राहुल गांधी हे दलितांच्या घरी पिकनिक व हनिमुनसाठी जातात, असे वादग्रस्त वक्तव्य रामदेवबाबांनी केल्याने दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. याविरुद्ध विनोद खोब्रागडे यांनी वरोरा येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिका:यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)