शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

रमेश कदमला २८पर्यंत कोठडी

By admin | Published: September 16, 2015 12:35 AM

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम याला २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम याला २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष व जिल्हा न्यायाधीशांनी आज दिला. महामंडळात ३८५ कोटी रुपयांचे घोटाळे कसे झाले याची जंत्रीच विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी मंगळवारी न्यायालयात सादर केली. ‘लोकमत’ने यापूर्वीच घोटाळ्याचा तपशील प्रसिद्ध केला आहे.रमेश कदमने पेडररोडला घेतलेल्या भूखंडाबाबत नवीन खुलासा आता समोर आला आहे. हब टाऊन कंपनीची उपकंपनी असलेल्या कुमराल रिअ‍ॅलिटी इस्टेट प्रा. लि. कंपनीच्या नावावर हा ८०० चौरस मीटरचा भूखंड होता. आ. कदम आणि त्याचा पीए विजय कसबे यांनी या कंपनीचे १०० टक्के शेअर खरेदी केले. त्यासाठी महामंडळाकडून तब्बल ९६ कोटी रुपये हब टाऊन आणि कुमराल कंपनीकडे वळते करण्यात आले. औरंगाबाद येथे यूपीएससी/ एमपीएससी मार्गदर्शन केंद्राकरता जमिनीची खरेदी करण्यासाठी ११ कोटी ४० लाख रुपये महामंडळाकडून कोहली या व्यक्तीला देण्यात आले. प्रत्यक्षात २ एकर जमीन ही कदमच्या नावावर खरेदी करण्यात आली. मैत्री शुगरला दिलेल्या ३० कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये हब टाऊन कंपनीकडे वळविण्यात आले. उर्वरित ५ कोटी रुपयांत कमलाकर ताकवाले आणि गाडेकर या आपल्या दोन सहकाऱ्यांच्या नावाने वळविण्यात आले. जोशाबा ग्राहक संस्थेला दिलेल्या ४१ कोटी रुपयांमध्ये १० कोटी रुपये हे संतोषी सिव्हिल कंपनीला देण्यात आले. कुमराल कंपनीला ८ कोटी रुपये वाटले. ५ कोटी रुपये कदमने स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यात टाकले. १ कोटी ३० लाख रुपये हे तिरुपती एंटरप्रायजेसला दिले. ७२ लाख रुपये स्टर्लिंग मोटर्स या फर्मला देण्यात आले. ७१ लाख रुपयांत येवला-नाशिक मार्गावर कदमने जमीन खरेदी केली. बोरीवली येथे त्याने २ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला आणि बीड बायपास; औरंगाबाद येथे ११.५० कोटींची जमीन खरेदी केली. याशिवाय, महिला समृद्धी योजनेच्या नावाखाली १४८ कोटी रुपयांचे गैरव्यवहार करण्यात आले.या सगळ्यांची माहिती अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयात सादर केली. (विशेष प्रतिनिधी)