चिपळूण (जि. रत्नागिरी) : पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर चिपळूणचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पक्षाचा एक नेता शिवसेनेला सहकार्य करत आहे आणि हे पक्षश्रेष्ठींना कळवूनही ते त्याची दखल घेत नाहीत, अशी खंत व्यक्त करून कदम यांनी सोमवारी पक्षातून बाहेर पडत असल्याचे पत्रकारपरिषदेत जाहीर केले. थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मनधरणी केली तरी आता परत जाणार नाही, असेही त्यांनी घोषित केले. दोन दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण पुढील दिशा जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. कदम आणि गुहागरचे आमदार, माजी मंत्री भास्कर जाधव आणि कदम यांच्यात वाद सुरू आहे. जाधव यांनी शिवसेनेला मदत केल्याचा आरोप कदम यांनी मतदान झाल्यादिवशीच केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही तरी त्यांचा पूर्ण रोख भास्कररावांवरच होता. (वार्ताहर)
रमेश कदम यांचा राष्ट्रवादीला रामराम
By admin | Published: December 27, 2016 12:57 AM