शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

रमेशचा मृतदेह धारावीत सापडला

By admin | Published: January 12, 2016 2:44 AM

सेल्फीच्या नादात समुद्रात बुडालेल्या तरुणीचा जीव वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतलेल्या जिगरबाज रमेश वळुंजचा मृतदेह सोमवारी धारावीच्या मिठी नदीकाठी आढळून आला.

मुंबई : सेल्फीच्या नादात समुद्रात बुडालेल्या तरुणीचा जीव वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतलेल्या जिगरबाज रमेश वळुंजचा मृतदेह सोमवारी धारावीच्या मिठी नदीकाठी आढळून आला. धारावी येथील राजीव गांधी झोपडपट्टीलगत असलेल्या मिठी नदीकाठी सकाळी साडेआठच्या सुमारास हा मृतदेह स्थानिकांच्या नजरेत पडला. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांसह अग्निशमन दल तेथे दाखल झाले. मृतदेह गाळात रुतलेला असल्याने त्याला बाहेर काढण्यास तब्बल तीन तास लागले. अखेर स्थानिक तरुणांना पाण्यात उतरवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास रमेशच्या नातेवाइकांना व्हॉट्स अ‍ॅपवर पोलिसांनी मृतदेह सापडल्याची माहिती दिली. रमेश जिवंत असेल, अशी त्याचे कुटुंबीय मनाची समजूत काढत होते. पण मृतदेह पाहताच वळुंज कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. सायंकाळी ७च्या सुमारास रमेशचे पार्थिव वांद्रे येथील घराकडे आणण्यात आले. खारदांडा येथील स्मशानभूमीत रमेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)उद्धव ठाकरेंकडून वळुंज कुटुंबीयांचे सांत्वन... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रमेश वळुंजच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांचे सांत्वन करत कुटुंबाला मदत करण्याची हमी त्यांनी दिली.तरन्नुमचा शोध सुरू : जिगरबाज रमेश वळुंज या तरुणाने जिवाची पर्वा न करता अंजुम आणि मुश्तरीचे प्राण वाचवले. समुद्रात आतपर्यंत गेलेल्या तरन्नुमला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली होती. मात्र तिच्यासह तो समुद्राच्या प्रवाहात आत खेचला गेला. रमेशचा मृतदेह हाती लागला आहे. मात्र अद्याप तरन्नुमचा थांगपत्ता लागलेला नाही.