शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

 शरद पवारांसाठी राणेंचे विधिमंडळातून रामेश्वराला गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 8:41 PM

शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत गौरवौदगार काढताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पवार यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आपले कोकणातील कुलदैवत रामेश्वराला थेट विधिमंडळातून गाऱ्हाणे घातले. 

मुंबई, दि. 4 -   महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ राज्य विधिमंडळात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत गौरवौदगार काढताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पवार यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आपले कोकणातील कुलदैवत रामेश्वराला थेट विधिमंडळातून गाऱ्हाणे घातले. राणे म्हणाले, "शरद पवार यांना अनेकवेळा जवळून पाहायची संधी मिळाली. पवार साहेब कोणत्या रसायनाने बनले आहेत. हे कळत नाही.  पवार साहेबांनी 55 वर्षांत केलेले काम आणि कर्तुत्व हे राज्यासाठी मार्गदर्शक आहे. मी तर बोलतो शरद पवार हे चालते बोलते विद्यापीठ आहे. तास दोन तासात बोलून पुर्ण होऊन शकत नाही इतकं अथांग काम त्यांचे आहे. कोणताही विषय असो त्यात रस कसा घ्यायचा हे पवारांकडून शिकावे. ते वरुन हेलिकॉप्टर मधून जात असतील तरी महाराष्ट्रातला कोणता तालुका आहे, त्याचे प्रश्न काय आहेत ते तिथे बसून बोलून दाखवतात." जेव्हा शेतकरी आर्थिक सबळ जेव्हा होईल तेव्हा साहेबांच्या 55 वर्षाच्या कामाचे सार्थक होईल असे सांगत माझ्या कुलदैवत रामेश्वराकडे प्रार्थना करुन साहेबांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, असे गाऱ्हाणे राणेंनी घातले. "पवार साहेबांनी 55 वर्षात विविध क्षेत्रासाठी जे योगदान दिले आहे, ते क्वचितच इतर व्यक्ती देऊ शकेल. राजकीय मतभेद असले तरी पवार साहेबांचे कर्तृत्व कुणीही नाकारू शकत नाही. मी शासनाचा आभारी आहे की पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणला गेला.  आदर्श प्रतिनिधी व्हायचे असेल, आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तर पवार साहेबांना जाणून घ्यावे लागेल. माझे आवडते नेते बाळासाहेब आहेत. पण मला विचाराल राजकारणातला आवडता नेता कोण विचाराल तर शरद पवार." असेही राणे पुढे म्हणाले.