नाशिक : अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचा मुद्दा निवडणुकीचा नव्हे, तर हिंदूंच्या अस्मितेचा असून, या वर्षअखेरीपर्यंत मंदिराची उभारणी करूनच दाखवू, असा दावा माजी केंद्रीय कायदामंत्री व भाजपा नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी येथे केला. एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आलेले स्वामी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या देशात कायम कोठे ना कोठे निवडणुका होत असतात. मग राममंदिर कधीच बनवायचे नाही का? मुळात अयोध्येत रामाचे मंदिर होते, हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. मंदिराच्या जागी शिया मुस्लिमांनी मशीद बांधली होती. त्यांचे वंशज शरयू नदीच्या दुसऱ्या तीरावर मशीद बांधण्यास राजी आहेत. मग आता सुन्नी मुस्लीम या प्रकरणात का हस्तक्षेप करीत आहेत? मशीद ही केवळ मुस्लिमांची नमाज पठणाची जागा असून, ती हलवली जाऊ शकते. अन्य मुस्लीम देशांतही याला मान्यता असून, तसे पत्रच आम्ही सौदी अरेबियातून आणून ते सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहोत.
राममंदिर निवडणुकीचा नव्हे, अस्मितेचा मुद्दा!
By admin | Published: January 18, 2016 3:47 AM