ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 13 - पिंपरी-चिंचवड महापालिका स्विकृत सदस्य निवडीवरून भारतीय जनता पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी पिंपरीतील मोरवाडीतील भाजपा कार्यालयात राडा केला. पक्षविरोधी काम करणाºयांना स्विकृतची बक्षीसी दिल्याबद्दल खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड सचिन पटवर्धन यांच्या पुतळ्यांचे दहन केले. पुण्याप्रमाणेच पिंपरीतील भाजपात गटबाजीचे राजकारण सुरू झाले असून खासदार साबळे आणि अॅड. पटवर्धन यांच्या विरोधात भाजपाच्या नव्या आणि जुण्या कार्यकर्त्यांनी बंड केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीपासूनच भाजपात अंतर्गत धुसफुस सुरू आहे. उमेदवारीतही नाकारल्याने कार्यकर्त्यांनी बंड केले होते. सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ जुण्या जाणत्या कार्यकर्त्यांना स्विकृतवर संधी दिली जाईल, असे आश्वासन नेत्यांनी दिले होते. त्यानंतर महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आली आहे. स्विकृतसाठी दोन्ही आमदार, खासदार, राज्यमंत्र्यांनी शिफरशी केल्या होत्या. मात्र, ऐनवेळी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या शिफारशींना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी केराची टोपली दाखविली.
स्विकृतचे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाकडून नावांची घोषणा होत नव्हती. त्यामुळे पक्षनेते एकनाथ पवार आणि पदाधिकारी मुस्विकृतवरून भाजपात राडा, खासदार, मंत्र्यांच्या पुतळ्यांचे दहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशाची वाट पाहत होते. दोनवेळा मुदतवाढ घेतल्यानंतर पाच तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा एसएमएसवरून भाजयुमोचे मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, बाबू नायर यांची नावे पाठविली. त्यावर खासदार साबळे समर्थक थोरात, पटवर्धन सर्मर्थक नायर यांच्या निवडीबद्दल भाजपातील जुण्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. गेले पाच दिवस कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस सुरू होती. स्थानिक नेते समजूत काढण्याचे काम सुरू होते. मात्र, आज या नाराज कार्यकर्त्यांनी सायंकाळी चारला पिंपरी मोरवाडी येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यालय गाठले.
दरम्यान आंदोलन होणार असल्याची कुणकुण लागल्याने महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. पक्षाची बदनामी होईल, असे कृत्य करू नका, अशी विनवणी केली. यावेळी माजी नगरसेवक राजेश पिल्ले, भाजपाचे शहर सरचिटणीस प्रमोद निसळ, कुणाल लांडगे,नगरसेविका सुजाता पालांडे, अनुप मोरे, रामकृष्ण राणे आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान बैठक सुरू असतानाच काही कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर आले. साबळे आणि पटवर्धनांच्या विरोधात घोषणाबाजी करीत पुतळ्यांचे दहन केले. मिथुन मथुरे, निलेश अष्टेकर यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान बैठक सुरू असतानाच काही कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर आले. मिथुन मथुरे, निलेश अष्टेकर यांनी साबळे आणि पटवर्धनांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पुतळ्यांचे दहन केले. तसेच कार्यालयातील दोघांच्या छायाचित्राला काळे फासले. अचानक घडललेल्या प्रकाराने सर्वांची तारांबळ उडाली होती. पाचच मिनिटात घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी जळालेले पुतळे रस्त्यातून बाजूला केले.
राजेश पिल्ले म्हणाले, ‘‘पक्षविरोधी काम करणाºया माऊली थोरात यांना खासदारांनी स्विकृतची बक्षीसी दिली आहे. ही चुकीची बाब आहे. पंचवीस वर्षे काम करणाºयांना संधी नाही परंतु नुकत्याच दाखल झालेले्या नायर यांनाही पटवर्धन यांनी स्विकृतवर संधी दिली आहे. पक्षनिष्ट कार्यकर्त्यांची नावे देणे अपेक्षीत होते. मात्र, या दोन्ही नेत्यांना पक्षाचे देणे घेणे नाही. ते कधीही पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय नसतात. चुकीची नावे मुख्यमंत्र्यांना दिली असल्याने मुख्यमंत्र्यांनीही ती नावे जाहिर केली. मुख्यमंत्र्यांना विरोध नसून त्यांची दिशाभूल करणाºयांना विरोध आहे.’’
नगरसेविका सुजाता पालांडे म्हणाल्या, ‘‘मला उमेदवारी मिळाल्यानंतर माऊली थोरात यांनी पक्षविरोधी काम केले होते. माझ्या विरोधात प्रचार केला. अशा व्यक्तीला स्विकृतवर संधी देणे म्हणजे बंडखोरांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे.’’
भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयातील फलकावरील आपल्या प्रतिमेला काळे फासण्याचा तसेच पुतळ्याचे दहन करण्याचा प्रकार म्हणजे भाजपच्या नेतृत्वावर व पक्षाच्या विचारधारेवरच केलेला हल्ला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भाजपचे खासदार अमर साबळे यांनी बोलताना दिली. तर अॅड. पटवर्धन यांनी "नो कॉमेंट्स" म्हणत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. खासदार साबळे यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीबाबतचा निर्णय पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने घेतलेला आहे. त्यामुळे हा हल्ला साबळे अथवा पटवर्धन यांच्या प्रतिमांवर नसून तो थेट पक्षाच्या विचारधारेवर व पक्षाच्या नेतृत्वावर झालेला हल्ला आहे. पक्षाच्या निरागस कार्यकर्त्यांची माथी भडकविण्याचे काम काही तथाकथित मंडळी करीत आहेत. हा प्रकार पूर्णपणे निंदनीय असून आपण या घटनेचा निषेध करीत आहोत, असे साबळे म्हणाले.