अभिजित कोळपे -
अंथुण्रे (जि. पुणो)
मेंढय़ांची प्रदक्षिणा.. पताका, ध्वज घेतलेल्या वारक:यांचे संचलन.. डोक्यावर तुळस घेऊन धावणा:या महिला.. विणोकरी आणि शेवटी टाळक:यांनी केलेल्या ‘तुकाराम तुकाराम’च्या अखंड गजराच्या तालावर तहान-भूक हरपून बेभानपणो नाचणारे वारकरी. यामुळे बेलवाडीतील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यात ‘ताण गेला, क्षीण गेला.. अवघा झालासे आनंद’ असे भाव वारक:यांच्या चेह:यावर दिसत होते.
सकाळी बरोबर 9 वाजता तुकोबारायांची पालखी बेलवाडीतील रिंगणस्थळी पोहोचली. टाळ-मृदंग-चिपळ्यांच्या निनादात केवळ ‘तुकोबा तुकोबा’चाच गजर सुरू होता. एक-एक दिंडी जेव्हा रिंगणस्थळी यायला लागली, तेव्हा हाच गजर गगनाला भिडू लागला. सोहळ्याच्या शेवटी दोन अश्वांनी अतिवेगवान अशा प्रदक्षिणा मारल्या. त्या वेळी महिला व पुरुषांनी बेभानपणो खेळाला सुरुवात केली. संपूर्ण पालखीस्थळावर लहान-थोर फुगडय़ा, फेर आणि नृत्यात बेभान झाले होते. अतिशय अद्भुत असा नजारा सकाळच्या कोवळ्या उन्हात बेलवाडीतील या पहिल्या रिंगण सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
रिंगण सोहळ्यासाठी गावक:यांनी हलवले गाव
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील रिंगणस्थळी पूर्वी गावातील अनेकांची घरे होती. त्यामुळे येथे रिंगण करताना वारक:यांना त्रस होत होता. दोन वर्षापूर्वी ग्रामस्थांनी एकमुखी ठराव करून येथील घरे हटवून दुस:या ठिकाणी वसवली. तसेच ही जागा यापुढे कायमस्वरूपी पालखी सोहळ्यासाठी द्यायचे ठरवले. त्यामुळे या मोठय़ा जागेत होणारा हा दुसरा रिंगण सोहळा असून येथे तुकोबांच्या नामगजरात वारकरी बेभान होऊन नाचत होते.
आजचा मुक्काम
निमगाव केतकी
सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान पालखी अंथुण्रेहून मार्गस्थ होणार असून, शेळगाव फाटा, 54 फाटा, त्यानंतर दुपारच्या विश्रंतीसाठी गोतंडीत येणार असून, रात्रीच्या मुक्कामासाठी निमगाव केतकी येथे पोहोचणार आहे.
पंढरपुरात
1.2क् लाख लिटर केरोसीनचा साठा
1आषाढी यात्र सोहळ्याला येणा:या भाविकांसाठी 1 लाख 2क् हजार लिटर केरोसीनचा साठा उपलब्ध करण्यात आला असून, या कालावधीत मागेल त्या भाविकांना अनुदानित दरानुसार गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. केरोसीन व गॅसचा काळाबाजार होऊ नये, यासाठी 27 अधिका:यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
2आषाढी यात्र सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक व अन्य राज्यांतून तब्बल 1क् लाखांहून अधिक भाविक येतात. आषाढी सोहळ्यासाठी श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत तुकाराम महाराज पालख्यांसह येणा:या भाविकांसाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत सवलतीच्या दरात केरोसीन व गॅसचा पुरवठा करण्यात येतो.
3तालुका पुरवठा विभागाने 2 लाख 8क् हजार लिटर केरोसीन साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने 1 लाख 2क् हजार लिटर केरोसीन साठा उपलब्ध केला आहे. तसेच जिल्हा पुरवठा विभागाने गॅसचा मुबलक साठा उपलब्ध केला असून, ¨दंडीतील मागेल त्या भाविकांना सवलतीच्या दरात गॅसचा पुरवठा करणार आहे.
नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान रे.।
फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेलं रान रे.।
अशी आर्त साद घालत चांदोबाचा लिंब येथे संत शिरोमणी ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण रविवारी पार पडले. रिंगण पूर्ण झाल्यानंतर ज्या मार्गावरून माऊलींचे अश्व गेले तेथे वारकरी नतमस्तक झाले .