शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जळगावात दारुबंदीसाठी रणरागिणींचा प्रेरणादायी लढा

By admin | Published: January 16, 2017 8:52 AM

दारुमुळे संसाराची राख रांगोळी झालेल्या महिलेने दारुबंदीसाठी संघर्षाची ठिणगी टाकली आणि महिलांनी एक दुसऱ्यांना हाक देत गावातून दारु हद्दपार करण्याची मशाल पेटवली.

ऑनलाइन लोकमत/ मतीन शेख
जळगाव, दि. 16 - दारुमुळे संसाराची राख रांगोळी झालेल्या महिलेने दारुबंदीसाठी संघर्षाची ठिणगी टाकली आणि महिलांनी एक दुसऱ्यांना हाक देत गावातून दारु हद्दपार करण्याची मशाल पेटवली. संघर्षाची ही लढाई लढली ती वढोदा (ता.मुक्ताईनगर जि.जळगाव) येथील रणरागणींनी. पाऊणे दोन वर्षाचा संघर्ष करून मुक्ताईनगर पंचायत समितीच्या उपसभापती प्रमिला भागवत राठोड व महिलांनी कुऱ्हा या गावात दारुबंदी करण्यास भाग पाडले. हा संघर्ष गावातील गल्लीबोळापासून दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. कुऱ्हा गावापासून जवळच असलेल्या वढोदा गावातही दारुबंदीसाठी महिलांनी एल्गार पुकारला. दारुमुळे संसाराची होणारी राखरांगोळी, महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार, मुलांचे भविष्य आणि पोटाची खळगी भरण्यासाठी उभा ठाकणारा यक्षप्रश्न यातून सुटका करण्यास वढोदा गावातील महिलांनी गाव दारुमुक्त करण्याचा विडा उचलला. 
 
दारुमुक्तीसाठी या रणरागिणी केवळ एकत्रच आल्या नाही तर त्यांनी त्यासाठी चळवळ उभारली. जनजागृतीसाठी अगदी वाजंत्री लावून देशभक्तीपर गाण्यावर दारुमुक्त सृदृृढ गावाची साद घातली. २३ आॅक्टोबर २०१६ रोजी दारुबंदीसाठी विशेष महिला ग्रामसभा येथे झाली. सभेच्या पुर्वसंध्येला वाजंत्रीसोबत दारुबंदीच्या घोषणांची साथ देऊन काढलेली मिरवणूक संघर्षाच्या या लढ्याला ऊर्जा देणारी ठरली आणि रात्री ९ वाजेपर्यंत दारुबंदीच्या लढ्याबाबत सभा गाजली. २३ आॅक्टोबरच्या विशेष महिला ग्रामसभेत तेराशे महिला उपस्थित होत्या. या सभेत गावातील दारु दुकाने कायमस्वरुपी बंद करण्यासह वढोदा गावकुसाबाहेर देखील ग्रामपंचायत आता नाहरकत दाखला देणार नाही,असा महत्त्वपूर्ण ठराव पारीत करण्यात आला.
 
सोबतच दारूबंदी विषयीचे निवेदनावर उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले. ग्रामसभेचा ठराव व दारुबंदीसाठी दिलेल्या निवेदनावरील महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यात आली. सहा हजार ८९३ लोकसंख्या असलेल्या या गावात दोन हजार ४८९ पुरूष तर दोन हजार २३७ महिला मतदार आहेत. यापैकी एक हजार २४५ महिलांनी दारुबंदीसाठी सह्यांचे निवेदन दिले होते. ५७.५९ टक्के महिला मतदार दारुबंदीबाजूने असल्याचा अहवाल उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
 
आता जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच दारुबंदीसाठी येथे गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. अगदी ५० दिवसातील हा लढा मतदान प्रक्रियेपर्यंत पोहचणे कौतुकास्पद आहे. राज्यात अनेक गावात वर्षानुवर्षे दारुबंदीचा लढा सुरू आहे. अशात कायद्याच्या चौकटीतील महिलांचा हा संघर्ष इतरांना ही प्रेरणादायी आहे. गावात लवकरच दारुबंदीचे आदेश निघतील, अशी गावकऱ्यांना आशा आहे. 
 
 
दारुबंदी करणारच 
दारुबंदी व्हावी ही महिलांची मागणी होती. यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला आणि गावातील नागरिकांनीही त्याला साथ दिली आहे. - किशोर खेरडकर, सरपंच, वढोदा ता. मुक्ताईनगर. 
 
वढोद्यात दारुबंदी करणारच असा आमचा निर्धार आहे. कारण याचा त्रास आमच्या आया- बहिणींना होतो. ज्या दिवशी ग्रामसभा आणि मतदान झाले. त्यादिवशी मजुरी करणाऱ्या महिलांनी त्या दिवसाच्या मजुरीवर पाणी सोडले. यावरुन त्यांच्या मनातील तळमळ जाणता येईल. - नसीमबी पठाण, उपसरपंच, वढोदा ता. मुक्ताईनगर.
 
 
 

संघर्षाची ठिणगी बनली मशाल -वढोदा ता. मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे दारुबंदीसाठी आयोजित ग्रामसभेला उपस्थित महिला.