रत्नागिरी/ औरंगाबाद : भाजपामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजपा नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी केला. तर, भ्रष्टाचारी राणेंना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही, असे सांगत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत खा. राऊत म्हणाले, राजकीय क्षेत्रात ‘आपल्याबरोबर दोघे फ्री’ ही आॅफर देत नारायण राणे फिरत होते. मात्र त्यांची ही आॅफर कोणीच स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांना नाइलाजाने ‘महाराष्टÑ स्वाभिमान’ पक्ष काढावा लागला. ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही; स्वाभिमान कशाशी खातात, हे माहिती नाही, त्यांच्याकडून कोण काय अपेक्षा ठेवणार?‘स्वाभिमान’ या शब्दाची त्यांनी विटंबनाच केली आहे. ‘स्वाभिमान’ या नावाने पक्ष काढण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही. उपकारांची परतफेड अपकाराने करायची दुसºयाच्या ताटामध्ये घाण करायची. कृतघ्नपणा करून राजकीय हैदोस घालायचा ही राणेंची संस्कृती आहे. ते ज्या पक्षात जातात तेथे भांड्याला भांडे लावत नाहीत तर भांडेच फोडून टाकतात. त्यामुळे भाजपाने त्यांना दूर ठेवले असावे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.नवीन पक्षाची स्थापना केल्यानंतर राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली़नीतेशकडे खरा स्वाभिमान!आमदार नीतेश राणेंकडे स्वाभिमान आहे. कारण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, असे खा. राऊत यांनी सांगितले असता ‘अजूनतरी’ असे म्हणायचे का, असे विचारताच ते म्हणाले की, नीतेश काँग्रेस पक्षात राहतील, कारण कॉँग्रेसमुळे ते आमदार झाले. राणे पक्ष काढत असताना नीतेशने पितृपे्रम बाजूला ठेवून कॉँग्रेसमध्येच राहणे पसंत केले, त्यामुळे हा त्यांचा खरा ‘स्वाभिमान’ आहे.दोन वेळा शिवसेनेने केले पराभूतजो चेंबूरच्या चित्रपटगृहाबाहेर तिकिटे विक्री करीत होता, त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व पदे उपभोगायला मिळाली. या पदांच्या उपभोगातून अमाप माया जमवणाºया नारायण राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका खा. चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केली.पैशाच्या जीवावर सर्व काही करता येते या भ्रमात राणे यांनी राहू नये, दोन वेळा शिवसेनेने पराभूत केल्याची आठवण ठेवावी, असे सांगून खैरे म्हणाले, त्यांनी आताही भाजपामध्ये जाण्यासाठी सर्व प्रयत्न केले; मात्र भाजपावाल्यांनी का घेतले नाही? तरीही भाजपाने प्रवेश न दिल्यामुळे ते सुद्धा अभिनंदनास पात्र असल्याचे खैरे यांनी सांगितले.राणेंकडून बुलेट ट्रेनचे समर्थनआधुनिक, नव्या गोष्टींना विरोध का, असा प्रश्न करीत बुलेट ट्रेनला विरोध करणाºया शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नारायण राणे यांनी मुंबईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. मात्र त्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना राणे यांनी चांगलीच दमछाक झाली, पण तरीही त्यांनी नेटाने बुलेट ट्रेनचे समर्थन केले. रेल्वेचा निधी कापून बुलेट ट्रेन येत नाही, त्यासाठी स्वतंत्र कर्ज घेतले आहे. शिवसेना आणि मनसेने आधी करारातील अटीशर्तींचा अभ्यास करावा आणि मगच बुलेट ट्रेनला विरोध करावा, अशी भूमिका राणे यांनी मांडली.सिंधुदुर्गात जल्लोषकणकवली (जि.सिंधुदुर्ग) : नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केल्याची घोषणा मुंबईत केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली येथील राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीसह फटाक्यांची आतषबाजी केली.राणे यांनी नवीन पक्षाची स्थापना करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केली आहे. त्यांचा हा निर्णय आम्हांला संजीवनी देणारा आहे, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
दिल्लीपर्यंत भीक मागूनही राणेंचे हात रिकामेच ! - शिवसेनेचा पलटवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 4:06 AM