शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

पेंग्विनमुळे राणीबागेला ‘अच्छे दिन’!

By admin | Published: April 08, 2017 3:06 AM

गेल्या अनेक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात प्राणी नसल्याने, टीकेला सामोरे जाणाऱ्या राणीबागेचे पेंग्विन आगमनानंतरच ‘अच्छे दिन’ सुरू झाले

चेतन ननावरे,मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात प्राणी नसल्याने, टीकेला सामोरे जाणाऱ्या राणीबागेचे पेंग्विन आगमनानंतरच ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत. दर महिन्याला सरासरी लाखभर पर्यटक भेट देणाऱ्या राणीबागेत पेंग्विन आणल्याने, महिन्याभरात दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. इतकेच नाही, तर पर्यटक वाढीमुळे प्रशासनाने अवघ्या अर्ध्या महिन्यातच ११ लाख १६ हजार २२ रुपयांची कमाई केली आहे.गेल्या वर्षभरात कधीही राणीबागेत एकाच महिन्यात दोन लाख पर्यटकांनी भेट दिलेली नाही. इतकेच नव्हे, तर या विक्रमी गर्दीमुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षभरातील सर्वाधिक महसुलाची नोंद झाली आहे. याआधी गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत राणीबागेत सर्वाधिक म्हणजे १ लाख ५० हजार ८१० पर्यटकांनी भेट दिली होती. त्यात १ लाख २९ हजार २५० प्रौढ, तर २१ हजार ५६० बारा वर्षांखालील पर्यटकांचा समावेश होता. या पर्यटकांमुळे पालिकेला ६ लाख ८९ हजार ३७० रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र, १८ मार्चला पेंग्विन दर्शन खुले केल्यानंतर, अवघ्या ४ एप्रिलपर्यंत म्हणजेच १६ दिवसांत पालिकेच्या तिजोरीत ११ लाख १६ हजार २२ रुपये जमा झाले आहेत. त्यातही बुधवारी राणीबाग पर्यटकांसाठी बंद असतानाही, पालिकेच्या महसुलात चौपट वाढ झाली आहे.अद्याप राणीबागेत प्रवेशासाठी प्रौढांकडून प्रतिव्यक्ती ५ रुपये, तर ३ ते १२ वर्षांमधील बालकांकडून प्रत्येकी २ रुपये तिकीट दर आकारले जातात. त्यातही शैक्षणिक सहलीमधील शाळकरी मुलांकडून सवलतीच्या दरात प्रति विद्यार्थी १ रुपये नाममात्र शुल्क घेतले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे, शुक्रवारी तर १२ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश मिळतो. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई होत आहे.कमाईचे नवे उच्चांकपेंग्विन दर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी कमाईचा नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. या एका दिवसात भेट दिलेल्या पर्यटकांच्या तिकीट, बाईक व कार पार्किंग शुल्क, कॅमेरा शुल्क अशा विविध माध्यमातून प्रशासनाला १ लाख १० हजार ४९५ रुपयांची कमाई झाली आहे. याउलट गेल्या वर्षी विविध सात महिन्यांत एक लाखाहून कमी कमाईची नोंद आहे.राणीबागेत किलबिलाट वाढलाएकट्या मार्च महिन्यात २९ हजार ९७१ बालपर्यटकांनी राणीबागेला भेट दिल्याची माहिती आहे. याआधी मे महिन्याची सुटी वगळता कोणत्याही महिन्यात २० हजारांहून अधिक बालकांनी राणीबागेला भेट दिली नव्हती. याउलट पेंग्विन दर्शन सुरू झाल्यापासून रोज सरासरी अडीच ते तीन हजार बच्चेकंपनी पेंग्विन पाहण्यास हजेरी लावत आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे़३ लाखांहून अधिक पर्यटक भेटीलामहापालिकेच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात २ लाख २७ हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली आहे. मात्र, या आकडेवारीत अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या नाही. त्यामुळे ज्येष्ठ आणि अपंग पर्यटकांची संख्या पकडल्यास राणीबागेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या तीन ते साडेतीन लाखांच्या घरात जाते.पर्यटकांचा महापूरपेंग्विनमुळे रविवारी तर राणीबागेत पर्यटकांचा महापूर येत आहे. पेंग्विन दर्शन खुले झाल्यानंतर, पहिल्याच रविवारी २१ हजार ८०० पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली होती, तर दुसऱ्या रविवारी पर्यटकांचा आकडा २० हजार ७१८ इतका होता....तर महापालिकेचा महसूल २० पटीने वाढणार!महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला असून, लवकरच प्रौढांकडूून १०० रुपये तिकीटदर आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या महसुलात आणखी २० पटीने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत राणीबागेच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक निधी वसूल होण्याची शक्यता आहे. परिणामी, याच निधीतून विकासनिधी उपलब्ध झाल्यास, भविष्यात विविध प्रजातीचे नवे प्राणी राणीबागेत पाहण्याची संधी पर्यटकांना मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.>काचघरातील खडकांना तडेवर्षभराच्या वादावादीनंतर १७ मार्च रोजी पेंग्विनच्या कक्षाचे द्वार मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून राणीच्या बागेला उसंत नाही. दररोज आठ ते दहा हजार मुंबईकर पेंग्विन पाहण्यासाठी येत असतात. मात्र पेंग्विनला ठेवण्यात आलेल्या काचघरातील खडकांना तडे गेल्याची तक्रार वॉचडॉग फाउंडेशनच्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे. मात्र प्रशासनाने या आरोपांचे खंडन करत ही तर विशेष डिझाईन असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे पेंग्विनच्या काचघरातील खडकांना दोन ठिकाणी तडा गेल्याचे दिसून येत आहे. पारदर्शक काचघर तयार करणाऱ्यांना हे तडे दिसलेच असतील. त्यांनी ते बुजवावे, असा टोला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी लगावला आहे. तसेच पेंग्विन प्रकल्पासाठी ‘आॅफिसर आॅफ द मंथ’ या किताबाने गौरविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारा, अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, हे तडे नैसर्गिक असून, चिंतेचे कारण नाही. या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही. पेंग्विन कक्ष खुला झाल्यापासून येथे रोज सरासरी १० हजार लोकांची गर्दी होत आहे. महिन्याभरात साडेतीन लाख पर्यटक राणीच्या बागेत येऊन गेले आहेत.पेंग्विनच्या मुद्द्यांवरून यापूर्वीच सत्ताधारी वर्गावर विशेषत: शिवसेनेवर टीका झाली आहे. मुळात राणीच्या बागेतील प्राण्यांसह पक्ष्यांची काळजी घेण्यास प्रशासन समर्थ नाही, असा सूर विरोधकांसह पक्षिमित्रांनी लगावला आहे.राणीबागेला एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान भेट दिलेल्या पर्यटकांची महिनानिहाय आकडेवारीमहिनाप्रौढबालकएकूण पर्यटकएप्रिल-२०१६९०,२४७१,२५९९१,५०६मे-२०१६१,२९,२५०२१,५६०१,५०,८१०जून-२०१६६७,३००७,४७०७४,७७०जुलै-२०१६६२,३२१४,५६०६६,८८१आॅगस्ट-२०१६८३,३७९९,२०८९२,५८७सप्टेंबर-२०१६७७,८५६८,७१४८६,५७०आॅक्टोबर-२०१६८४,४४७१०,४६९९४,९१६नोव्हेंबर-२०१६१,०५,५००१८,६३२१,२४,१३२डिसेंबर-२०१६१,०३,८००१७,५०७१,२१,३०७जानेवारी-२०१७१,२२,०४२१७,९५५१,३९,९९७फेब्रुवारी-२०१७८६,०५८१२,३१३९८,३७१मार्च-२०१७१,९८,०००२९,९७१२,२७,९७१एकूण१२,१०,२००१,५९,६१८१३,६९,८१८