मुंबई : नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेचा मुहूर्त गाठून गुरुवारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ नावाच्या नव्या संघटनेची कोल्हापुरात अंबाबाईच्या साक्षीने मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजचे अनावरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फॉलोअर्स वाढविण्याचा प्रारंभ केला.>नारायण राणेंनी काँग्रेस सोडली!मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देऊनही काँग्रेसने ते पाळले नाही. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,असे सांगत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा सभापतींकडे सुपुर्द केला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरटीका केली, तर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून आभार मानले.>सदाभाऊंची रयत क्रांती!स्वाभिमानी खा. राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बडतर्फ केलेले कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची कोल्हापुरात स्थापना केली. आपल्या संघटनेच्या माध्यमातून शेतकºयांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि युवकांना विधायक मार्गदर्शन केले जाईल, असे खोत यांनी सांगितले. खा. शेट्टी यांच्या एककल्ली कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली.>राज ठाकरे फेसबुकवर!मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजचे मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात अनावरण झाले. नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्याकार्यकाळात कसलाच बदल झाला नाही. थापेबाज मोदी सरकार आगामी सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याच्या प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केला.
राणे, खोत, राज यांची नवी माळ, घटस्थापनेच्या मुहूर्तावर तीन पक्षांत तीन घडामोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 6:56 AM