रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
नारायण राणो यांना पक्ष, पक्षश्रेष्ठी, सरकार व मुख्यमंत्र्यांविरुद्ध भूमिका घेण्याची सवय असल्याचे चित्र पक्षाध्यक्षांकडे रंगविण्यात आल्याने, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करू, असे राणो वारंवार सांगत असले तरी त्यांना सोनियांची भेट मिळण्यात अडचणी येत आहेत. ते बुधवारी अथवा गुरुवारी भेट घेणार असल्याची चर्चा आहे, परंतु सोनियांनी सबुरीचा सल्ला देत भेट काही काळ पुढे ढकलल्याचे अधिकृत सूत्रंनी सांगितले.
सूत्रंनी सांगितले, मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता राणोंनी सरकारच्या कारभारावर जाहीरपणो टीका केली, म्हणजे अप्रत्यक्षपणो मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरच बोट ठेवून विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिल्याची भावना काँग्रेसश्रेष्ठींकडे पोहचविण्यात आल्याने 1क्, जनपथ राणोंवर नाराज असल्याचेही सांगितले जाते. या पाश्र्वभूमीवर राणो यांनी मोबदल्याची भाषा केल्यास त्यांच्या हाती फार काही लागण्याची शक्यता नाही, असे सूत्रंचे म्हणणो आहे. तथापि, मराठा आरक्षणाचा रेंगाळलेला विषय राणोंनी मार्गी लावल्याने व त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसला लाभ होण्याची शक्यता राणोंच्या दिल्लीतील समर्थकांनी श्रेष्ठींर्पयत रेटून नेल्याची एकमेव बाब राणोंच्या पथ्यावर पडली.
राणोंच्या आक्रमतेमुळे आघाडीच्या राजकारणाला अनेकदा अडचणी कशा आल्या तेसुद्धा सप्रमाण सांगण्यात आले आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केल्यावर राणोंना मंत्रीही न केल्याने त्यांनी पक्षनेतृत्वावर केलेली चौफेर टीका, त्यामुळे पक्षाने त्यांचे केलेले निलंबन व शेवटी ‘मी जे काही बोललो होतो, त्याचा खेद वाटतो.’ अशा आशयाचा काँग्रेसश्रेष्ठींना त्यांनी सादर केलेला माफीनामा या 2क्क्9 च्या फेब्रुवारीतील नाटय़ाची आठवण पुन्हा काँग्रेसश्रेष्ठींना करून देण्यात आल्याचे सूत्रंनी सांगितले.
राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर वेगळी भूमिका घेतल्याने राणोंच्या राजकीय मोबदल्याबाबत 1क्, जनपथने अजून विचार केलेला नसल्याचे सूत्रंनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाध्यक्षांसोबत अजून भेट ठरलेली नाही. आम्ही राणो यांच्याशी चर्चा करतो आहोत. आमदार कृपाशंकर सिंह म्हणाले, मुख्यमंत्री स्वत: राणोंशी बोलत असून, काही सकारात्मक मार्ग सापडेल.
राणो, सर्मा यांना चुचकारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
पक्ष आईसारखा असतो, तिच्याशिवाय मुलांना अनाथ वाटते, असे सांगून काँग्रेसने आज महाराष्ट्र आणि आसाममधील बंडखो:यांना थंड करण्याचा प्रयत्न केला. सोबतच राजकीय संधीसाधूपणाबद्दल नेत्यांवर प्रहारही केला. उच्चपदाची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि राजकीय संधीसाधूपणा व्यक्तीला नकारात्मक व्यवहार करण्यास बाध्य करते, असे काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सूरजेवाला म्हणाले. सूरजेवाला म्हणाले की, लोक महत्त्वाकांक्षा बाळगू शकतात. पण कोणतीही महत्त्वाकांक्षा संघटनेच्या हितापेक्षा मोठी असू शकत नाही.