शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवाच - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:19 PM

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत कोणतेही विधान केले नाही. फक्त अफवा पसरवण्याची कामे सुरू आहे. असा खुलासा  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.

सावंतवाडी : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत कोणतेही विधान केले नाही. फक्त अफवा पसरवण्याची कामे सुरू आहे. असा खुलासा  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेची जागा काँग्रेसचीच असून, आम्ही आमचा उमेदवारच उभा करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, मनसे यांना आघाडीमध्ये घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसच्या कोकण जनसंपर्क यात्रेचा शेवटचा टप्पा सावंतवाडीतून सुरू झाला असून, त्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सोमवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, काँग्रेस कोकण प्रभारी बी. संदीप, भाई जगताप, माजी आमदार सुभाष चव्हाण, राजन भोसले, विजय सावंत, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, दिलीप नार्वेकर, आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. काही जागा या मित्रपक्षांना द्यायच्या आहेत. त्यामुळे या आठवडाभरात अंतिम निर्णय घेतला जाईल. आघाडीत महाराष्ट्र स्वाभिमान तसेच मनसे या दोन पक्षांना घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रस्ताव आम्हाला दिला नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच  कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी ही लोकसभेची जागा काँग्रेसची असून, आम्ही आमचाच उमेदवार येथे उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जर भाजप सरकार विरोधात उपोषणाचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे स्वागतच आहे.

आम्ही नेहमी चांगल्या गोष्टींसाठी पाठिंबा देत असतो. त्यामुळे जनतेच्या हिताच्या गोष्टी असतील तर  आमचा हजारेंना पाठिंबाच राहील, असे यावेळी त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये समाधानी नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये येतील, असे विधान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी असे कोणतेच विधान थोरात यांनी केले नाही. माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि एखाद्या व्यक्तीला काँग्रेसमध्ये यायचे असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे प्रस्ताव येईल. पण असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सध्या राज्य आर्थिक संकटात आहे. भाजप सरकारच्या निवडणूक घोषणा सुरू आहेत. पण जनता यात फसणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तरी चालतील, काँग्रेस निवडणुकीला केव्हाही सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यावेळी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNarayan Raneनारायण राणे