शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

रावसाहेब दानवे साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र विसरले - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 10, 2017 8:20 AM

रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - शेतकरी आत्महत्येसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. तोंडावर लगाम ठेवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी करूनही भाजप पुढाऱ्यांच्या जिभांचे तडतडणे सुरूच आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिभेचे काय करायचे, असा प्रश्न आता मुख्यमंत्री फडणवीस यांनाही पडलाच असेल. 
 
रावसाहेब दानव्यांनी आता शेतकऱयांच्या दुःखावर डागण्या देत सांगितले आहे की, कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या. दानवे यांच्या नव्या तोंडपट्टयांमुळे सरकारवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले अशा शब्दात दानवेंवर टीका करण्यात आली आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी तर, दानवे अशी विधाने तर करत नाही ना ? अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. दानवे यांच्या जिभेने मुख्यमंत्र्यांना ‘डंख’ मारण्याचे जे उद्योग आरंभले आहेत त्यामागे त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच तर नाही ना, असे अग्रलेखात म्हटले आहे. शेतकरी कर्जाच्या अजगरी विळख्यात सापडला आहे. हा विळखा दूर करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांत नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांचे हे असे धिंडवडे तरी काढू नयेत. बरं, दानवे महाशय हे बोलले कुठे, तर साईबाबांच्या शिर्डीत. वास्तविक दर्शनानंतर साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र घेऊनच भाविक शिर्डीतून बाहेर पडतात. तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नेमका हाच मंत्र विसरले. दानवेंनी शिर्डीत जे वक्तव्य केले त्यातून शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती ‘श्रद्धा’ आहे हे तर समजलेच; शिवाय कसे बोलावे याचे भान सोडून त्यांनी ‘सबुरी’चेही धिंडवडेच काढले अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- सरसकट कर्जमाफीने अर्थव्यवस्था कोलमडेल वगैरे विचार ठीक आहेत, पण जनताच जिवंत राहिली नाही तर तुमच्या त्या अर्थव्यवस्थेस काय पालखीत बसवून मिरवायचे आहे? दानवे यांच्यासारखे पुढारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात विरोधी पक्षाकडे ‘हमी’ मागतात हा तर चेष्टेखोरीचा कळसच झाला.
 
- तोंडावर लगाम ठेवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी करूनही भाजप पुढाऱ्यांच्या जिभांचे तडतडणे सुरूच आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिभेचे काय करायचे, असा प्रश्न आता मुख्यमंत्री फडणवीस यांनाही पडलाच असेल. रावसाहेब दानव्यांनी आता शेतकऱयांच्या दुःखावर डागण्या देत सांगितले आहे की, कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या. दानवे यांच्या नव्या तोंडपट्टय़ांमुळे सरकारवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले. दानवे यांच्या जिभेने मुख्यमंत्र्यांना ‘डंख’ मारण्याचे जे उद्योग आरंभले आहेत त्यामागे त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. शेतकरी जगवण्यासाठी सरकारने आकाशपाताळ एक करायला हवे. महाराष्ट्र राज्य हे शेतकऱयांच्या आयुष्याचे स्मशान झाले आहे व गेल्या दोन वर्षांतच चारेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात हे काही आमच्या राज्याला भूषणावह नाही. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली साफ चिरडला गेला आहे. एका दुष्टचक्रात तो फसला आहे. कर्ज काढून तो शेती करतो, ती निसर्गाच्या तडाख्यात पुनः पुन्हा नष्ट होते. कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ. 
 
-  शेती करण्यासाठी तो पुनः पुन्हा कर्ज काढतो व फसत जातो. या दुष्टचक्रातून तो बाहेर कसा पडणार? कधी पीकपाणी बरे झाले तर त्या शेतमालास हमीभाव नाही व तूरडाळीपासून कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येते अशी आमच्या शेतकऱ्यांची दैना झाली आहे. या भयंकर दुष्टचक्रातून सुटण्यासाठी तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असेल तर ते मायबाप सरकारचेच अपयश आहे. शेतकरी कर्जाच्या अजगरी विळख्यात सापडला आहे. हा विळखा दूर करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांत नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांचे हे असे धिंडवडे तरी काढू नयेत. बरं, दानवे महाशय हे बोलले कुठे, तर साईबाबांच्या शिर्डीत. वास्तविक दर्शनानंतर साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र घेऊनच भाविक शिर्डीतून बाहेर पडतात. तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नेमका हाच मंत्र विसरले. दानवेंनी शिर्डीत जे वक्तव्य केले त्यातून शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती ‘श्रद्धा’ आहे हे तर समजलेच; शिवाय कसे बोलावे याचे भान सोडून त्यांनी ‘सबुरी’चेही धिंडवडेच काढले. 
 
-  अर्थात, अशा तऱ्हेने बोलण्याची रावसाहेबांची ही काही पहिलीच वेळ नाही. ‘निवडणुकीच्या एक दिवस अगोदर लक्ष्मीदर्शन होत असते. अशी लक्ष्मी घरी आली तर परत करू नका, तिचे स्वागत करा’, असे आवाहनच दानवे महाशयांनी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मतदारांना केले होते. आता मात्र शेतकरी आत्महत्यांच्या संवेदनशील विषयावरून ते विरोधकांवर घसरले आहेत. खरे तर कर्जमाफी हा कायमचा तोडगा नसून शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी केलेली तातडीची मलमपट्टी आहे. सरसकट कर्जमाफीने अर्थव्यवस्था कोलमडेल वगैरे विचार ठीक आहेत, पण जनताच जिवंत राहिली नाही तर तुमच्या त्या अर्थव्यवस्थेस काय पालखीत बसवून मिरवायचे आहे? दानवे यांच्यासारखे पुढारी शेतकऱयांच्या आत्महत्येसंदर्भात विरोधी पक्षाकडे ‘हमी’ मागतात हा तर चेष्टेखोरीचा कळसच झाला. आज जो उठतोय तो आमच्या शेतकरी बांधवांची चेष्टाच करतोय. शेतकऱयांची मते हवीच आहेत, पण त्यांना मरताना पाणी पाजायला पुढे जायचे नाही, उलट पाणी पाजले तरी तो मरणारच नाही याची गॅरंटी काय? असे मूर्खपणाचे सवाल केले जात आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडास पानेच पुसली आहेत. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची हमी काय? या प्रश्नाच्या दोरीवर तेदेखील उड्या मारीत आहेत. शेतकऱयांच्या गळ्य़ाभोवती लागलेला फास सोडवायला मात्र कोणीच पुढे येत नाही. महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरे काय म्हणायचे!