आम्ही पडायला आलो, आम्ही पडायला आलो असा जो कांगावा सुरु आहे, परंतू कोणीही त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत नाहीय. भाजपाचे साडेतीन नेते कोण, हे जनतेला ऐकायचे होते. जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा लहानपणी फुसका फटाका वाजवायचो तशी त्यांची पत्रकार परिषद झाली. मुंबईत कार्यकर्ते असताना नाशिक आणि पुण्यातून माणसे बोलवावी लागलीत, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला.
जे आरोप केलेत ते निराधार आहेत. किरीट सोमय्या असतील किंवा अन्य कोणी सिद्ध करा, आम्ही तयार आहोत. तुम्ही घोटाळ्यांची चौकशी करावी, राज्य सरकार तुमच्या हातात आहे. कागदे दाखविली का? हातात घेऊन बसले. या कहानीचा शेवट आम्ही करू, असा इशारा रावसाहेब दानवे यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यकर्त्यांची कमतरता आहे का? तुम्ही जे आरोप करता ते सिद्ध करावेत. युतीमध्ये फूट पाडण्यास आम्ही रिकामे नाही. हे अमर अकबर अँथनीचे सरकार आहे. ते कधी एकमेकांच्या पायात पाय घालून पडतील कळणार नाही. ज्यांच्यासोबत गेला त्यांच्यासोबत सुखाने रहा. अमित शहा यांना फोन करायला त्यांनी माणसे पाठवली का? झुकले तेव्हाच मुख्यमंत्री झाल्याची टीका दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. झुकले वाकले आता पुढची वेळ येईल अशी टीकाही दानवे यांनी केली.
ईडी ईडीचे काम करतेय आम्ही कशाला सांगू त्यांना यांच्याकडे त्यांच्याकडे जा. जमिन कितीही घ्या त्याची ईडी चौकशी करेल ना. तुम्ही घोटाळा करून राज्यावर बसलात त्याचे काय? असा सवाल त्यांनी केला.