शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

VIDEO: दानवेंचा दमदारपणा! जलआक्रोश मोर्चात गर्दीला आवरण्यासाठी स्वत: उतरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:40 PM

औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला.

औरंगाबाद-

औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला. मोर्चात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. फडणवीसांनी औरंगाबादमधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं. या मोर्चात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील सहभागी झाले होते. त्यांनीही आपल्या छोटेखानी भाषणात ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले. पण दानवेंनी या मोर्चात केलेल्या एका कृतीची देखील जोरदार चर्चा होऊ लागली आहे. 

"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

त्याचं झालं असं की जलआक्रोश मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. फडणवीस, दानवे आणि भाजपाचे प्रमुख नेते एका ओपन कारमधून मार्गस्थ होत होते. पण कारच्या समोरच कार्यकर्ते गर्दी करु लागल्यानं मोर्चा पुढे सरकत नव्हता. पोलीसही कार्यकर्त्यांना पुढे सरकण्याचं आवाहन करत होते. पण ते काही ऐकेनात. मग रावसाहेब दानवेच कारमधून खाली उतरले, हातात एक भाजपाचा झेंडा घेतला आणि झेंड्याच्या काठीनं गर्दीला कारच्या समोरुन दूर लोटू लागले. दानवेंच्या या दमदारपणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोलसभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे नवीन नामकरणही केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला दानवे म्हणाले की, "पाणी मिळता का..?किती दिवसाला मिळतं..?" यावर लोकांनी आठ दिवसाला मिळतं, असे सांगितलं. त्यानंतर रावसाहेब दानवेंनी या सरकारचं नवं नाव 'जुम्मे के जुम्मे' सरकार ठेवलं. दानवे म्हणाले की, "हे सरकार अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार आहे. हे सरकार कधीच सोबत बसत नाहीत, जनतेच्या हिताचा निर्णय घेत नाही. राज्यातला कोणता प्रश्नही सोडवत नाही. यांना जे जमत नाही, त्याचं खापर केंद्रावर फोडतात." 

"हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण

"शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आमच्या सरकारच्या काळात समांतर पाणी पुरवठा योजना मान्य झाली होती. ही योजना यांच्या भानगडीमुळे बंद झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अतुल सावे, हरीभाऊ बागडे यांनी 1680 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली. सरकार बदलले, युती भाजप सेनेची होती आणि या लोकांनी दुसऱ्याशी संगनमत केलं.  लोकांनी आम्हाला मतदान केलं, पण आमची मतं चोरीला गेली. चोर सापडला, पण चोराला शिक्षा आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात द्यायची आहे. याची सुनावणी तुमच्या दराबारात सुरू आहे," असंही दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद