ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - विधानभवनाच्या प्रांगणात शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळयात शिवसेनेच्या ५ कॅबिनेट मंत्र्यांना राज्यपाल सी . विद्यासागर राव यांनी गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भाजपाच्या ५ कॅबिनेट व सेना-भाजपाच्या प्रत्येकी ५-५ राज्यमंत्र्यांना सुध्दा शपथ देण्यात आली. शिवसेनेच्या १० तर भाजपाच्या १० मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले एकनाथ शिंदे आणि डॉ. दीपक सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली तर भाजपाकडून गिरीश बापट, जामनेरचे आमदार गिरीश महाजन, मराठवाडयातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावणकुळे आणि अर्जूनी मोरगावचे आमदार व नितिन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजकुमार बडोले यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
मित्रपक्षांच्या नेत्यांची सोहळयाला दांडी
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मित्रपक्षांची शपथविधी सोहळयाला अनुपस्थिती होती. रिपाइं नेते रामदास आठवले वगळता मित्रपक्षांच्या नेत्यांनी या सोहळयाकडे पाठ फिरवल्याचे दिसले. तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांपैकी केवळ वसंत डावखरे या सोहळयाला उपस्थित होते.
राज्यमंत्री - (शिवसेना )
संजय राठोड
दादा भुसे
विजय शिवतारे
दीपक केसरकर
रवींद्र वायकर
राज्यमंत्री - (भाजप )
राम शिंदे
विजयकुमार देशमुख
अंबरीश राजे आत्राम
रणजित पाटील
प्रविण पोटे