शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आमदार नितेश राणेंविरुद्ध खंडणीचा गुन्हा

By admin | Published: May 20, 2017 3:39 AM

सांताक्रूझ पोलिसांनी आमदार नितेश राणेंसह तिघांविरुद्ध शुक्रवारी पहाटे खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. जुहू येथील हॉटेल एस्टेलामध्ये भागीदारीसाठी नितेश राणे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सांताक्रूझ पोलिसांनी आमदार नितेश राणेंसह तिघांविरुद्ध शुक्रवारी पहाटे खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. जुहू येथील हॉटेल एस्टेलामध्ये भागीदारीसाठी नितेश राणे यांनी धमकावून महिन्याला १० लाख रुपयांची मागणी करत, हॉटेलमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.जुहू रोड परिसरात आॅक्टोबर २०१६ पासून निखिल मिराणी आणि हितेश केसवानी यांनी एस्टेला हॉटेल सुरू केले. त्यानंतर नितेश राणे यांनी त्या दोघांसमोर हॉटेलमध्ये भागीदारीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, हॉटेल सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने दोघांनीही हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून राणे त्यांच्याकडे भागीदारीसाठी मागे लागले होते.गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नितेश राणे यांनी त्यांना पुन्हा भागीदारीसाठी विचारले. मात्र, दोघांनीही नकार दिल्यावर राणेंनी त्यांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिली, असा त्यांना पुन्हा भागीदारीसाठी विचारले. मात्र, दोघांनीही नकार दिला. तेव्हा राणेंनी त्यांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिल्याचा आरोप हितेश केसवानी यांनी केला आहे. त्याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघे जण हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी हॉटेलमध्ये असलेल्या जवळपास ६० ग्राहकांना धक्काबुकी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली. राजकीय नेत्याच्या नावाने दोघे जण हॉटेलमध्ये तोडफोड करत असल्याची माहिती मिळताच, केसवानी, मिराणी यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. केसवानी यांच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी नितेश राणेंसह शेख आणि अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितेश राणेंनाही लवकरच या प्रकरणात अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी दिली. पराग संघवींनाही भागीदारी दिल्याचा आरोपकेसवानींच्या आरोपानुसार, नोव्हेंबर २०१६ मध्ये सांताक्रुझमध्ये झालेल्या बैठकीत राणेंनी पी. बी. रिअ‍ॅल्टीचे पराग संघवी यांनाही या हॉटेलमध्ये ५० टक्के भागीदारी देण्यास सांगितले. नकार देताच धमकावून करारनाम्यावर जबरदस्तीने सह्या घेतल्या. दोघांनीही एकाही पैशांची गुंतवणूक न करता, करारनाम्यांवर सही करून घेतल्याचा आरोप केसवानी यांनी केला आहे. त्यानंतर, कामादरम्यान संघवी यांनी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, व्यवसायात तोटा आल्यामुळे ते पैसे परत मागत असल्याचे जबाबात नमूद केले आहे.भागीदारीसाठी अशीही खटपट (जबाबात दिलेल्या माहितीनुसार)मे २०१६ - हॉटेलचे काम सुरू केलेआॅक्टोबर २०१६ - हॉटेलमध्ये भागीदारीसाठी प्रस्ताव(१० दिवसांत वरळी, सांताक्रुझ, नरिमन पॉइंट येथील नामांकित हॉटेलमध्ये राणेंसोबत तीन ते चार बैठका झाल्या. )नोव्हेंबर २०१६ - करारनाम्यावर जबरदस्तीने सह्याडिसेंबर २०१६ - धमकावणेमे २०१७ - हॉटेल खाली करण्यासाठी घुसखोरी