इचलकरंजी : येथील खंजिरे मळा परिसरात चार वर्षाच्या बालिकेवर 40 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला. रफिक बाबासाहेब जमादार असे त्याचे नाव आहे.
रफिकला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी दुपारी या वेळेत संबंधित पीडित मुलगी रफिकच्या दुकानासमोर खेळत असताना खाऊचे आमिष दाखवून त्याने दुकानात बोलावून घेतले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिने आई-वडिलांना सांगितले. पालकांनी रुग्णालयात नेले असता हा प्रकार लक्षात आला. पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्यांनी हरोली येथील राहत्या घरातून रफिकला रात्री अटक केली. (प्रतिनिधी)