विरार : एका २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व यातून गर्भवती झाल्यानंतर हे मूल आपले नसल्याचे सांगून बेदम मारहाण करणाऱ्या तरुणाला अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. नालासोपारा येथे वास्तव्याला असलेल्या पीडित तरुणीची दोन वर्षा भरापूर्वी छट पूजे निमित्त आरोपी समीर शेख या तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर आरोपी तरुणाने पीडित तरुणीशी सलगी करून विश्वास संपादन केला होता. त्यानंतर लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले होते. यातून तरुणी गर्भवती झाली. ही बाब निदर्शनास आणून लवकर लग्न करण्याचा तगादा तरुणीने सुरु केला. मात्र, हे मूल आपले नसल्याचे सांगून समीरने शिवीगाळ करीत तिला बेदम मारहाण केली. काही दिवसंपूर्वी समीरने दुसऱ्या मुलीशी साखरपुडाही केला. या प्रकाराची माहिती मिळताच पीडित तरुणीने अर्नाळा पोलीस ठाण्यात फसवणुक आणि बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली.त्यानंतर शनिवारी संध्याकाळी समीरला अटक करण्यात आली. (वार्ताहर)
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
By admin | Published: October 17, 2016 3:03 AM