शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By admin | Published: October 25, 2016 10:24 PM

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करवून घेणा-या आरोपीविरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 25 - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी (वय २२) शरीर संबंध प्रस्थापित करणा-या आणि गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करवून घेणा-या आरोपीविरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रजत किशोरसिंग बावनगडे (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो गांधीबागमधील अग्रसेन चौकाजवळ राहतो. पीडित तरुणी इंदो-यातील रहिवासी आहे. ती खासगी कंपनीत कार्यरत असताना वर्षभरापूर्वी आरोपी रजतच्या संपर्कात आली. मैत्रीनंतर या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेऊन या दोघांनी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यांच्यात वारंवार शरीर संबंध प्रस्थापित झाल्यामुळे तिला गर्भधारणा झाली. लग्नाच्या अगोदर तू बाळाला जन्म दिल्यास समाजात बदनामी होईल, अशी भीती दाखवून आरोपी रजतने तिला गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपात केल्यानंतर लग्न करू, असे सांगून आरोपीने तिला गर्भपात करवून घेण्यास तयार केले. जरीपटक्यातील एका रुग्णालयात तरुणीचा गर्भपात झाला. त्यानंतर मात्र आरोपीने तिला टाळणे सुरू केले. लग्नालाही स्पष्ट नकार दिला. त्याने विश्वासघात केल्यामुळे तरुणीने रजतविरुद्ध जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.