बोरीवली पोलिसांची कारवाई : नालंदा महाविद्यालयातील महिलेने केली तक्रार
मुंबई : ईल फोटो लोकांपुढे आणोन, अशी धमकी देत माजी पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने बोरीवली पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीची दखल घेत बोरीवली पोलिसांनी ढोबळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र तक्रारदार महिलेने केलेले आरोप ढोबळे यांनी फेटाळले आहेत.
बोरीवली येथील गोराई परिसरात शाहू शिक्षण संस्थेचे सदस्य व आमदार लक्ष्मणराव ढोबळेंचे नालंदा महाविद्यालय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला याच महाविद्यालयात कर्मचारी आहे. ढोबळेंनी तीनवेळा बलात्कार केल्याचा दावा या महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. 2क्11 ते 2क्13 या कालावधीत ढोबळे संध्याकाळी महाविद्यालयात कोणी नसताना इमारत बांधकामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी मुख्याध्यापकांच्या केबीनमध्ये बोलावून जबरदस्ती केली. प्रतिकार केला तेव्हा जबर मारहाणही केली. त्यानंतर ईल फोटो लोकांपुढे आणोन अशी धमकी देऊन अत्याचार केले, असाही दावा महिलेने तक्रारीत केला आहे.
बोरीवली पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत ढोबळेंविरोधात कलम 376, 323 आणि 5क्6 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून त्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे परिमंडळ 12चे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी सांगितले. नालंदा महाविद्यालय एलएलबीच्या विद्याथ्र्याकडून प्रवेशासाठी घेतलेल्या शुल्कावरून चर्चेत असतानाच ढोबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आरोप खोटे, आकसापोटी
तक्रारदार महिलेने संस्थेतील कर्मचा:यांच्या पगाराचा 55 लाख रुपयांचा अपहार केला़ त्याबद्दल पोलिसांत तक्रार दिली होती़ तिला अटक झाली़ मग तिने आता हे आरोप केले आहेत़ दरमहा
15 हजार रुपये पगार घेणारी ही महिला तीन फ्लॅट आणि एक हॉटेल कसे काय खरेदी करू शकत़े त्यामुळे स्वत:ने केलेले अपहार उघड झाल्यानंतर अशा प्रकारचे चारित्र्यहनन करणारे आरोप करणो हे अध:पतन आह़े- लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री