लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जादूटोण्यात कालिका मातेला बळी देईन, अशी धमकी मोखाडा तालुक्यातील एका तरुणीला देऊन तिच्यावर भोंदूबाबाने बलात्कार केला असून, आरोपीला मदत करणाऱ्या १० जणांवर मोखाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, यातील आठ आरोपींना अटक झाली आहे. विशेष म्हणजे, त्यात मोखाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मंगला चौधरी यांचेही नाव आहे. तर या तरुणीने आपले बाबावर प्रेम असून त्याच्याशी स्वेच्छेने विवाह केल्याचे स्टॅम्पपेपरवर लिहून दिल्याने खरे कोण व खोटे कोण? असा प्रश्न पोलिसांपुढे पडला आहे. मुख्य आरोपी त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास (बाबा) याने गेल्या तीन महिन्यांपासून तिला खोडाळा, खुडेद (जव्हार) आणि बलसाड (गुजरात) अशा ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून माझे शारीरिक शोषण केले, अशी तक्रार या तरुणीने बुधवारी नोंदवली आहे. तर मुख्य आरोपीच्या जोडीला उर्वरित १० आरोपींनी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पळवून बळजबरीने लग्नही लावून दिल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्य आरोपीने भिलाड स्टेशन जवळील बंद खोलीत उपाशी ठेवून तुझा कालिका मातेला बळी देईन, अशी धमकी देऊन पुन्हा शारीरिक शोषण केले, असे या युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. पांडुरंग चौधरी, मंगला चौधरी, संदीप चौधरी, अलका बुधर, किरण भांबरे, मलिक शेख, मंगल लाखत, मोरे, संजय बुधर आणि चेतन दळवी यांच्यावर अपहरण करून तिचे लग्न लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
बळी देण्याच्या धमकीने बलात्कार!
By admin | Published: May 11, 2017 3:15 AM