लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ताडदेवमध्ये तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी आशिक वाकना (२६) या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत ग्रॅन्ट रोड परिसरात राहते. ताडदेव परिसरातील वाकनासोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर वाकनाने तरुणीचे विवस्त्र फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वाकनाने तिच्यावर १९ मे पासून २२ मेपर्यंत बलात्कार केला. अखेर वाकनाच्या अत्याचाराला कंटाळलेल्या तरुणीने ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. ताडदेव पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करत वाकना याला बेड्या ठोकल्या.
ताडदेवमध्ये तरुणीवर बलात्कार
By admin | Published: May 29, 2017 4:49 AM