जेजुरी (जि. पुणे) : आळंदी येथील एका कथित महाराजाने मोजे रिसे (ता. पुरंदर) येथील एका शाळेत १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ह.भ.प. अनिल सूर्यकांत हांडे (महाराज) याने ९ मेपासून स्वत:चे मूळ गाव रिसे येथील एका शाळेत ११०० रुपयांत प्रशिक्षण, राहण्याची सोय आदीसह २५ दिवसांचे बाल संस्कार शिबीर आयोजित केले होते. त्याने स्वत:ला मृदंग विशारद, कीर्तनकार असल्याची जाहिरात केली. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातून व परजिल्ह्यातील मुले-मुली शिबिरात सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील चवथीत शिकणारी १० वर्षांची पीडित मुलगीही या शिबिरात सहभागी झालेली होती.मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास या अल्पवयीन मुलीला महाराजाने स्वत:च्या खोलीत बोलावले. ओरडू नये म्हणून तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.
भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By admin | Published: May 14, 2015 1:49 AM