मुंबई : आईवडिलांच्या निधनानंतर आधार असलेल्या सख्ख्या भावानेच आपल्या 14वर्षीय बहिणीवर बलात्कार केला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना भांडुप येथे उघडकीस आली. या प्रकरणी सव्वीस वर्षीय नराधम भावावर भांडुप पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
चार वर्षापूर्वी आजाराने आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर तक्रारदार मुलगी भांडुप गावदेवी परिसरात भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. भावाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून वर्षभरापूर्वी त्याची पत्नी दोन मुलींना घेऊन माहेरी निघून गेली होती. अशात तक्रारदार मुलगी भावासोबत एकटीच राहत होती. मात्र भावाच्या आक्षेपार्ह वर्तणुकीमुळे ती रात्री झोपण्यासाठी शेजारील महिलेकडे जात असे आणि सकाळी शाळेत जाण्यासाठी 7च्या सुमारास ती घरी परतत असे. 4 ऑगस्ट रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणो घरी परतली. मात्र प्रकृती ठीक नसल्याने शाळेत न जाता विश्रंतीसाठी ती घरीच राहिली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या या मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकीही दिली. भीतीपोटी दोन दिवस तिने कुणाला काहीही सांगितले नाही. मात्र 6 तारखेला भांडुपमध्ये मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वहिनीला तिने वाटेतच गाठून झालेला प्रकार सांगितला. याबाबत वहिनीने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संजय बसवंत यांनी सांगितले. हा आरोपी व्यसनी असून, मिळेल ते
काम करून तो उदरनिर्वाह करत
होता. (प्रतिनिधी)
च्ङोरॉक्स काढण्यासाठी गेलेल्या 8 वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून एका वृद्धाने तिच्यावर बलात्कार करण्याची घटना कांजूर येथे घडली. या प्रकरणी हरिश्चंद्र गोठणकर (65) या नराधमाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
च्ही मुलगी आईवडिलांसोबत कांजूर चर्च
परिसरात राहत होती. बुधवारी सकाळी त्याच परिसरातील ङोरॉक्स दुकानात गेली होती. त्याचदरम्यान तेथे ङोरॉक्स काढण्यास आलेल्या गोठणकर याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानामागे नेत तिच्यावर बलात्कार केला.
च्याबाबत कुणाला काहीही न सांगण्यास दम भरला. तिने भीतीने काहीही सांगितले नाही. अखेर आज तिला त्रस होऊ लागल्यानंतर घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी आईने तिला घेऊन त्वरित कांजूर पोलीस ठाणो गाठले.