शहापूर : तालुक्यातील तानसा अभयारण्यात दुर्मीळ अशा रानघुबड प्रजातीतले जंगली घुबड (ाङ्म१ी२३ ङ्म६’ी३) जातीचे रानपिंगळा गटात मोडणारे घुबड आढळले आहे. ठाणे जिल्ह्णात विशेषत्वाने घुबडांच्या चार प्रजाती पाहायला मिळतात़ यात गव्हाणी घुबड, पिंगळा, शिंगी घुबड, हुमा घुबडांचा समावेश आहे. रानपिंगळा गटात मोडणारे रानघुबड अनेक वर्षांत प्रथमच तानसा अभयारण्यात पाहायला मिळाले आहे. याचे शास्त्रीय नाव अथेनी ब्लुईटी असून याला इंग्रजी संज्ञेत फॉरेस्ट औलेट म्हटले जाते. तानसा अभयारण्यात आढळलेल्या दुर्मीळ घुबडाच्या प्रजातीचा अभ्यास करण्यासाठी वाइल्ड लाइफ अॅण्ड वुई या पक्षी निरीक्षण व अभ्यास संस्थेला निमंत्रित करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक एस.आय. शेख यांनी सांगितले. (वार्ताहर)
तानसा अभयारण्यात आढळले दुर्मीळ घुबड
By admin | Published: November 18, 2014 2:37 AM