मनोर : डंपर चालक व मालकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करताना आ. नितेश राणे व कार्यकर्त्यांना सिंधुदूर्ग पोलीसांनी अटक केली. या अटकेचे पडसाद रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेण गावाच्या हद्दीत देखील उमटले. स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १५ मिनिटे वाहतूक अडवून पोलीस व जिल्हाधिकारी यांचा निषेध केला. मोदी सरकार हाय हाय अशी घोषणा करीत कार्यकर्ते निघून गेले मात्र पोलीसांना आंदोलनाची कल्पना नसल्याने ते पोहचू शकले नाही.सिंधूदूर्ग जिल्ह्यातील डंपर व गौण खनिज व्यवसायीकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या जाचक अटीच्या विरोधात आ. नितेश राणे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. राणेंसहीत ३८ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून त्याच्या निषेधार्थ रविवारी रात्री ९ च्या सुमारास स्वाभिमान संघटनेच्या जिल्हाध्यक्ष जीतेश पाटील यांनी नेतृत्वाखाली मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेन गावच्या हद्दत वाहने अडवून रस्त्यावर टायर्स जाळून १५ मिनिटे मोदी सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करून लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीसांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर स्वाभिमानकडून रास्तारोको
By admin | Published: March 08, 2016 1:46 AM