शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

उसाला एफआरपीप्रमाणे दर

By admin | Published: March 12, 2015 1:36 AM

राज्यातील उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल, असे अश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिले.

मुंबई : राज्यातील उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल, असे अश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिले.शेतक-यांचा उसाला रास्त दर मिळण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले, याविषयीचा तारांकित प्रश्न सुनील प्रभू, सुरेश हाळवणकर, दत्तात्रय भरणे, हनुमंत डोळस आदींनी विचारला . यावर सहकार मंत्र्यांनी लिखीत उत्तर दिले आहे. राज्यातील शेतक-यांना एफआरपीप्रमाणे उस दर देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने साखर आयुक्तांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना भेटीस बोलावले मात्र भेट दिली नाही. त्यामुळे चिडलेल्या शेतक-यांनी पुणे येथील साखर संकुलात आंदोलन केले. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी धोरणानुसार उसदर वेळेवर न देण्याची कारणे सरकारकडून लिखीत स्वरूपात सांगण्यात आली आहेत. यामध्ये सन २०१४-२५ च्या हंगामात साखरेचे सुरवातीस दर २६५० प्रती क्विंटल होते. त्यामध्ये घसरण होवून आज अखेर २४५० पर्यंत दर खाली आहेत. त्यामुळे एफआरपी दर देणे अवघड झाले आहे. साखरेचे दर, तसेच उपपदार्थ उदा. मोलॅसिस, बगॅस, स्पिरीट, एस.डी.इ.चे दरातही घसरण झाली आहे. त्याचबरोर मागील हंगामामध्ये निर्यात केलेल्या कच्च्या साखरेचे अनुदान कारखान्यांना केंद्र शसनाकडून झालेली नाही. असे असले तरीही उस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतूदीनुसार विहीत मुदतीत उस पुरवठादारांना एफआरपी प्रमाणे दर देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. याप्रमाणे दर अदा न केलेल्या संदर्भात वेळोवेळी सुनावण्या घेण्यात येत आहेत.