सिंधुदुर्गनगरी : ४१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस विभागाच्या क्रीडा स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सांघिक खेळ या प्रकारात रत्नागिरी पोलीस विभागाचे वर्चस्व राहिले. त्यापाठोपाठ नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांनी क्रमांक पटकाविले.सांघिक खेळांचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुढीलप्रमाणे- व्हॉलिबॉल स्पर्धेत महिला- रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई, खो-खो- महिला- रत्नागिरी, नवी मुंबई, पुरुष- ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, बास्केट बॉल महिला- नवी मुंबई, रत्नागिरी, हँडबॉल पुरुष- रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ट्रिपल जंप पुरुष- निवृत्ती भोईर (नवी मुंबई), करण पाटील (रायगड), अमित किर्वे (नवी मुंबई), भालाफेक पुरुष- अजय सावंत (रत्नागिरी), तुषार शिंदे (नवी मुंबई), धनाजी सुतार (रत्नागिरी), महिला- प्रतिभा सावंत (सिंधुदुर्ग), इस्प्रास आपोस (सिंधुदुर्ग), ललिता हंबीर (रायगड).४०० मीटर हर्डल्स महिला- करुणा सावंत (नवी मुंबई), संध्या पार्टे (नवी मुंबई), कविता देवर्डेकर (रायगड), पुरुष- राहुल काळे (सिंधुदुर्ग), प्रथमेश पाटील (रायगड), अमित गिर्वे (नवी मुंबई), ४०० मीटर धावणे महिला- संध्या पार्टे (नवी मुंबई), सोनाली गावडे (रत्नागिरी), शुभांगी सावंत (नवी मुंबई), पुरुष- राहुल काळे (सिंधुदुर्ग), नितीन पाटील (रायगड), विनोद भिल्ल (नवी मुंबई), १५०० मीटर धावणे महिला- कविता देवर्डेकर (रायगड), तृप्ती कुळये (सिंधुदुर्ग), सुजाता म्हात्रे (नवी मुंबई), पुरुष- प्रशांत सुर्वे (नवी मुंबई), आदेश घोडके (ठाणे ग्रामीण), विनायक भोरे (नवी मुंबई), क्रॉस कंट्री महिला- नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, पुरुष- नवी मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्याचे वर्चस्व
By admin | Published: January 08, 2015 10:01 PM