ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ९ - मुंबई - गोवा महामार्गावर बावनदीजवळ निवळी घाटात एसटीचा बस कोसळून झालेल्या अपघातात सात प्रवासी ठार तर ३१ जखमी झाले आहेत.
'एमएच २० बीएन २९३८' क्रमांकाची ही एसटी बस चिपळूनहून रत्नागिरीला जात असताना बाव नदीजवळ सकाळी ९:३० च्या दरम्यान हा अपघात झाला. या एसी बसला कोळसा वाहून नेणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. कंटेनरच्या धडकेने खोल असलेल्या दरीत फेकली गलेली ही बस मध्ये असलेल्या आंब्याच्या झाडाला आदळून अडकली. या अपघातग्रस्त एसटीमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी नगरपालिकेचा बंब, एसटी मंडळाची एक आणि खासगी क्रेनसह एसटीचे अधिकारी, पोलीस, स्थानिक नागरिक पोहचले. त्यांनी एसटीतील प्रवाशांना वाचविण्याचे शर्थीचे केले. अपघातातील जखमींना रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून संतोष सीतारम करंजवकर ( ठाणे), प्रभाकर शंकर क्षीरसागर ( चिपळूण-सावर्डे), नारायण श्रीपाद कुलकर्णी ( कुंभारखणे- संगमेश्वर), भारस्कर सखाराम कोकाटे ( सावर्डे) अशी आहेत.