रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यावर उपाय म्हणून १३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या मि-या, कुवारबाव, शिरगाव, निवळीसह ३७ महसुली गावांसाठी सुमारे ९० कोटी खर्चाची प्रादेशिक नळपाणी योजना बावनदीतील पाण्याचा वापर करून राबविली जाणार आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाकडून आवश्यक सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या तीन महिन्यात या प्रादेशिक योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडून शासनाकडे पाठवला जाणार आहे.ही ३७ महसुली गावे रत्नागिरी नगर परिषदेच्या जवळच्या परिसरात वसलेली असल्याने येथील लोकसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. सध्या रत्नागिरी नगर परिषदेची लोकसंख्या ७७ हजार आहे. या ३७ गावांमध्ये २०११च्या जनगणनेनुसार ७६ हजार ६८९ एवढी लोकसंख्या आहे. सन १९३५मध्ये ही लोकसंख्या १ लाख ११ हजार ६३७ असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. या गावांची पाण्याची मागणीही मोठी आहे. ही मागणी बावनदीतील मुबलक पाणी साठ्यामुळे पूर्ण होऊ शकेल. या योजनेचे सर्वेक्षण, अंदाजपत्रके व आराखडे यांची महाराष्टÑ जीवन प्राधिकरणमार्फत पूर्तता व्हावी, असा ठराव जिल्हा परिषदेने ६ जून २०१७ रोजी केला होता. याबाबत २१ नोव्हेंबर २०१७ रोजी आमदार सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. १३ गु्रप ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या ज्या ३७ गावांना या प्रादेशिक नळपाणी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये मि-या, जाकीमि-या, सडामिºया, शिरगाव, आडी, तिवंडेवाडी, झाडगाव, मुसलमानवाडी, निवळी, रावणंगवाडी, धनावडेवाडी, काजरेकोंड, कपिलनगर, करबुडेकोंड, कुंभारवाडा, मूळगाव, वेद्रेवाडी, डांगेवाडी, हातखंबा, तारवेवाडी, पानवल, घवाळेवाडी, खेडशी, गयाळवाडी, पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी, कुवारबाव, मिरजोळे, मधलीवाडी, ठिकाणवाडी, पाडावेवाडी, शीळ, नाचणे, आंबेशेत, कर्ला, मुसलमानवाडी, जुवे या महसुली गावांचा समावेश आहे. या योजनेचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल सन २०१८-१९ च्या कृती आराखड्यात करण्यात आला आहे. या ३७ पैकी अनेक महसुली गावांमध्ये नळपाणी योजना आहेत. त्यातील काही योजनांना एमआयडिसीकडून पाणी पुरवठा केलो जात आहे. तर काही योजना काही धरणांवर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
तारांगणसाठी ७ कोटी : रत्नागिरी योजनेबाबत आठवडाभरात निर्णयरत्नागिरी नगर परिषदेच्या नळपाणी योजनेचा निर्णय आठवडाभरात होईल. शहरात सव्वा कोटीच्या तारांगण प्रकल्पाला ७ कोटी मंजूर झाले आहेत. गणपतीपुळे आराखड्यासाठी २० कोटी तरतूद झाली आहे. जिल्ह्यातील जलसंधारणच्या १२ प्रकल्पांची रखडलेली कामे सुरू होणार आहेत. भगवती बंदर ब्रेक वॉटरवॉल ७५० मीटर लांबीची होणार असून, त्यासाठी १३० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. जयगड नळपाणी योजनेसाठी २७ कोटी मंजूर झाले आहेत. यासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते.