शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

"खोक्यांचे सत्य समोर येऊ नये म्हणून रवी राणा-बच्चू कडू यांच्यात समेट घडवला"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 3:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Bachchu Kadu Ravi Rana Disputes: "गुवाहाटी येथील खोक्यांच्या चर्चेचे सत्य राज्यातील जनतेसमोर कधीच येऊ नये या दृष्टीकोनातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्याशी चर्चा करुन समेट घडवून आणला. सुरतमार्गे गुवाहाटीतील खोक्यांचे सत्य जनतेसमोर येणे अपेक्षित होते. मात्र ज्या पध्दतीने दोघांना गप्प बसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता काही काळ तरी गप्प बसले जाईल, मात्र खोक्यांचे सत्य एक ना एक दिवस जनतेसमोर नक्कीच येईल," असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. खोक्यांबद्दलची सत्यता आता तरी झाकण्यात आली आहे, पण लवकरच हे सत्य जनतेसमोर येईल, असा खोचक टोला लगावत या संदर्भातील विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.

"राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती ही स्वाभिमानाच्या मुद्द्यावर झाली याची कल्पना खासदार सुजय विखे-पाटील यांना नसावी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे पवार कुटुंब आहेत. ते विखे कुटुंब नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर, शरद पवार यांच्यावर राज्यातील तमाम जनतेचा, कष्टकरी, मजूरांचा, महिला वर्गाचा, उद्योग क्षेत्रातील लोकांचा विश्वास आहे. सत्तेसाठी तडजोड राष्ट्रवादी किंवा शरद पवार करत नाहीत. पाच वर्षे सत्तेबाहेर राहिलो. आजही सत्तेबाहेर राहून झपाट्याने पक्षाची वाढ होत आहे, हे कदाचित खासदार सुजय विखे-पाटील यांना माहित नसावे. जे विखे कुटुंब सत्तेसाठी इकडे तिकडे कुठल्याही पक्षात विलीन होते, त्यांनी अशी टीका करु नये," असा टोमणाही महेश तपासे यांनी लगावला. म्हणाले.

कडू-राणा वादावर अखेर पडदा पडला!

गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. त्यानंतर आमदार रवी राणांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू यांच्यासाठी वापरलेले शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले. आमच्यात जे मतभेद होते त्यावर चर्चा झाली. मी आणि आमदार बच्चू कडू सरकार सोबत आहोत, बोलता बोलता तोंडातून काही वाक्ये निघाली असतील, तर ते वाक्य परत घेत आहे. बच्चू कडूंनीही आपले शब्द परत घ्यावेत, असेही आमदार रवी राणा म्हणाले.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस