शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नात चोरांची 'चैन'

By admin | Published: March 04, 2017 4:08 PM

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र तसेच भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले हातसफाई केल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 4 -  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र तसेच भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले हातसफाई केल्याची माहिती समोर आली आहे. या शाही विवाहसोहळ्यात सहभागी झालेल्या अनेकांचे मोबाईल, सोनसाखळी आणि पाकिटं चोरट्यांनी लांबवली आहेत.  याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
 
जबिंदा लॉन्स येथे संतोष दानवे यांचा रेणू सरकटे यांच्यासोबत 2 मार्च रोजी विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या विवाहासाठी केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांसह, विविध राजकीय पक्षाचे नेते, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी झालेल्या गर्दीत चोरट्यांनी आपले हात धुवून घेतले. नक्षत्रवाडी परिसरातील हिंदुस्थान आवास येथील शुभम घनश्याम गायकवाड हा तरुण संतोष दानवेंच्या लग्नासाठी उपस्थित होता. यावेळी गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 9 ग्रॅमची सोनसाखळी तोडून नेली.  हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.
 
उत्तरानगरी येथील प्रमोद खानझोडे हे सुद्धा या लग्नाला उपस्थित होते. यावेळी गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 15 हजाराचा मोबाईल चोरून नेला. तिसरी घटना नारायण बापुराव आष्टेकर (रा. मुकुंदवाडी)यांच्या बाबतीत घडली ती म्हणजे चोरट्यांनी त्यांचा सात हजाराचा मोबाइल लांबवला. तर न्यू एस.टी. कॉलनीतील रहिवासी कल्याणी खेडेकर यांचा 10 हजारांचा मोबाइल चोरट्यांनी चोरला. विजयंतनगर येथील अनिल पालांदुरकर यांचाही मोबाइल चोरीला गेला.