ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 16 : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचे खापर वाहनधारकांवरच फोडले आहे. वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता परिवहन विभागात होणारी अत्यल्प भरतीमुळे अधिकारी, कर्मचा:यांवर ताण निर्माण होऊन अनेकदा कामात दिरंगाई होत असल्याने अनेक वाहनधारक व चालक परवान्यांसाठी दलालांना गाठतात. त्यामुळे परवाने व अन्य कार्यवाहीत गैरप्रकारांना वाव मिळत असल्याचे सांगत रावते यांनी या प्रकाराला सर्वसामान्य जनतेसह वाहनधारक व वाहन चालकच जबाबदार असल्याचे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी विभागाच्या मेळाव्यात बोलताना रावते म्हणाले, विद्यार्थी वाहतूक व अन्य वाहन परवाने व कागदपत्रंसाठी वेळ नसल्याचे कारण देऊन अनेकजन दलालांमार्फत काम करून घेण्यास पसंती देतात. प्रत्येक्षात वाहन धारकांनी असे गैरमार्गाने परवाने मिळविणयापेक्षा व दलालाना पोसण्यापेक्षा आयुष्यभरासाठी मिळणा:या परवान्यांसाठी काही तास देण्याची गरज असून स्वत:च्या परवान्यांची पूर्तता स्वत:च करण्याची गरज असल्याचे परखड मत व्यक्त केले. त्यामुळे कर्मचारी व दलालांकडून चिरीमीरचे प्रकार घडण्याच्या विधानावर टाळ्य़ा पिटणा:या उपस्थितांमध्ये एकदम सन्नाटा पसरला. यावेळी रावते यांनी, आपण कडवट बोलत असल्याने ते अनेकांना आवडत नाही. परंतु,वाहनधारकांनी कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम करून नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
रावतेंनी फोडले भ्रष्टाचाराचे खापर जनतेवर
By admin | Published: July 16, 2017 7:29 PM